शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नावीन्यपूर्ण प्रकल्पांनी वेधले लक्ष

By admin | Updated: January 23, 2017 02:46 IST

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या येथील महात्मा गांधी हिंदी प्राथमिक शाळा व डॉ.झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळेत आयोजित विज्ञान

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या येथील महात्मा गांधी हिंदी प्राथमिक शाळा व डॉ.झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळेत आयोजित विज्ञान प्रदर्शनाच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनात अनेक नावीन्यपूर्ण प्रकल्पांचा समावेश होता. देहूरोड बाजारपेठेतील हिंदी व उर्दू प्राथमिक शाळेत प्रदर्शनाचे उद्घाटन कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप व उपाध्यक्षा अ‍ॅड. अरुणा पिंजण यांच्या हस्ते झाले. शिक्षण समिती अध्यक्ष ललित बालघरे, अर्थ समिती अध्यक्ष विशाल खंडेलवाल, सदस्य रघुवीर शेलार, हाजीमलंग मारीमुत्तू, सारिका नाईकनवरे, कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत, हिंदी प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका छाया कदम, ऊर्दू शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका निशांत शेख , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व पालक उपस्थित होते. प्रदर्शनात विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले होते. विद्यार्थ्यांनी नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर तयार केलेले एटीएम यंत्र, टाकाऊ वस्तूंपासून बनविलेले दुचाकी, प्रदूषण करण्याच्या सवयी व उपाय, स्वच्छता अभियानावर आधारित प्रकल्प आदी पन्नासहून अधिक प्रकल्प साकारले होते. हा उपक्रम वैज्ञानिक दृष्टी देणारा ठरणार असून, विद्यार्थ्यांनी सर्व प्रकल्प अत्यंत कल्पकतेने साकारल्याच्या भावना व्यक्त करून सानप यांनी कौतुक केले. प्रदर्शनातील उत्कृष्ट प्रकल्पांची सानप यांनी स्वत: निवड केली. बक्षीस समारंभ कार्यक्रमात प्रदर्शनातील उत्कृष्ट प्रकल्पांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. पहिली ते आठवीच्या विविध क्रीडा स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रास्ताविक निशांत शेख यांनी केले, मुस्कान शेख व सत्यम मौर्य या मुलांनी सूत्रसंचालन केले. जयश्री चौधरी यांनी आभार मानले. छाया कदम, राजश्री कामथे यांनी संयोजन केले. हिंदी व उर्दू प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांनी संयोजनासाठी परिश्रम घेतले. (वार्ताहर)