काळेवाडी : दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणावर काळेवाडी पोलीस चौकीसमोर कोयत्याने वार केल्याची घटना मंगळवारी सांयकाळी घडली होती. या घटनेतील आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य क्षीरसागर असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर बंड्या ऊर्फ सतीश रमेश सगर (वय २० , रा. थेरगाव) याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. आदित्य आणि सतीश यांच्यामध्ये पूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी आदित्यवर कोयत्याने वार केले होते. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आदित्यवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)
तरुणावर हल्ला करणाऱ्याला अटक
By admin | Updated: July 7, 2016 03:30 IST