शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दृश्य कलेबाबत अनास्था कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2016 01:29 IST

आपल्याबरोबरच समोरच्या व्यक्तींचे स्वातंत्र्य जपण्याचे संस्कार आतापासूनच मुलांवर करा. हे संस्कारच त्यांना सर्वांशी आदराने वागण्याबाबत मार्गदर्शक ठरतील

पिंपरी : आपल्याबरोबरच समोरच्या व्यक्तींचे स्वातंत्र्य जपण्याचे संस्कार आतापासूनच मुलांवर करा. हे संस्कारच त्यांना सर्वांशी आदराने वागण्याबाबत मार्गदर्शक ठरतील, असे प्रतिपादन दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी येथे केले. व्हीनस आर्ट फाउंडेशन, चंद्ररंग संस्थेच्या वतीने आलेल्या ‘एक चित्रकार की खोज में’ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर चित्रकार प्रा. प्रभाकर कोलते, महापौर शकुंतला धराडे, शंकर जगताप, शिक्षण मंडळ सभापती चेतन घुले, उपसभापती नाना शिवले, संयोजक अमर पाटील, अपूर्वा पाटील आदी उपस्थित होते.पालेकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्राचा ‘कान’ सुंदर स्वरांना दाद देतो. परंतु आम्हाला अजून कलेबाबत ‘नजर’ आली नाही. चित्रकला, शिल्पकला आणि स्थापत्यकला यामध्ये कधी महाराष्ट्रातील मागच्या पिढीने रस घेतला नाही. त्यामुळे राज्यातील थोर चित्रकारांचे काम नव्या पिढीपुढे आले नाही, याची खंत वाटते. कोल्हापूरच्या अंबाबाईचे मंदिर हेमाडपंती स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मात्र, ही कला कोठे लुप्त झाली? याला रसिकांची, शिक्षकांची कलावंतांशी संवाद साधण्याची उदासीनता कारणीभूत आहे. संगीताला जसे आपण सहज शरण जातो, तसे या कलांबाबत होत नाही. आपण शास्त्रीय अभिजात संगीत जेवढे ऐकले व समजून घेतले जाते, तेवढे दृष्यकलेबाबत केले जात नाही. त्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. धंदेवाईक चित्रपटांचे कौतुक होते.’’ परीक्षक प्रकाश वाघमारे, सतीश सुतार, सतीश काळे यांनी काम पाहिले. पाटील यांनी स्वागत केले, प्रतिमा जगताप यांनी सूत्रसंचालन केले, तर अपूर्वा पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)