शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गडकोट, किल्ल्यांवरून शिवज्योतींचे आगमन

By admin | Updated: February 20, 2017 02:14 IST

शहरासह नाणे, पवन, आंदर मावळ व आजूबाजूच्या गावांमध्ये तरुण मंडळ व युवकांच्या वतीने शिवजयंतीचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

कामशेत : शहरासह नाणे, पवन, आंदर मावळ व आजूबाजूच्या गावांमध्ये तरुण मंडळ व युवकांच्या वतीने शिवजयंतीचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. मावळातील विविध किल्ल्यांवरून शिवभक्तांनी सकाळी ढोल-ताशाच्या गजरात शिवज्योती आणल्या.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारात गुंतलेल्या कार्यकर्त्यांनी प्रचार बाजूला सारून शिवजयंती साजरी करण्यासाठी वेळ काढला. शिवज्योती आणताना कोणत्याही उमेदवाराचा प्रचार न करता छत्रपती शिवाजीमहाराजांचाच जयघोष केला. शिवज्योती आणताना भगवे झेंडे व शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. परिसरातील महिलांनी शिवज्योतीची आरती ओवाळली. नागरिक व ग्रामस्थांनी शिवज्योतीचे स्वागत केले. शिवप्रतिमा व शिवज्योतीचे विधिवत पूजन करून शिवाजीमहाराजांच्या स्मृतींना उजाळा देणात आला. शिवजयंतीनिमित्त प्रत्येक गावात मिरवणूक काढून शिवस्मारकावर फुलांची आरास व परिसरात लावलेले भगवे झेंडे यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण दिसत होते. परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल, ताशा आणि इतर वाद्य व शिव घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आंदर मावळात उत्साहटाकवे बुद्रुक : आंदर मावळात निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ नये याची काळजी घेत परिसरात साध्या पद्धतीने मात्र उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. येथील बाळराजे युवा मित्र मंडळाने भंडारा डोंगरावरून शिवज्योत आणली. येथील शिवस्मारकावर फुलाची सुंदर सजावट करण्यात आली होती. या वेळी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेस योगेश मोढवे, नंदू असवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पांडुरंग असवले, सुरेश असवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. मंगेश काकरे, स्वप्निल असवले, संकेत असवले, चैतन असवले, समीर असवले, फिरोज आत्तार, ललित प्रजापती, आदिनाथ असवले, रंजित असवले, विश्वनाथ असवले, ललित ओसवाल, नवनाथ मालपोटे,अमोल जांभूळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता असवले यांनी केले. संदीप ओसवाल यांनी आभार मानले. सायंकाळी छत्रपती शिवाजीमहाराज व जिजाऊ यांच्या प्रतिमेची ढोल-तशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.