शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी यंत्रणा झाली सज्ज

By admin | Updated: February 21, 2017 02:28 IST

शहरभरातून आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची सुरू असलेली लगबग, मतपेट्या आणि मतदान साहित्य घेण्यासाठी झालेली गर्दी

भोसरी / मोशी : शहरभरातून आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची सुरू असलेली लगबग, मतपेट्या आणि मतदान साहित्य घेण्यासाठी झालेली गर्दी, तसेच ठरवून दिलेल्या वाहनाची शोधाशोध असे चित्र सोमवारी (दि. २०) अंकुशराव लांडगे नाट्यगृह, तसेच संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात पाहावयास मिळाले. भोसरी, दिघी, बोपखेल, इंद्रायणीनगर, एमआयडीसी, चऱ्होली, मोशी परिसरातील एकूण सहा प्रभाग व २ लाख मतदारांसाठी एकूण २६५ मतदान केंद्रे निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली असून, निवडणूक यंत्रणा नियोजित मतदान केंद्रांवर सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.प्रभाग क्रमांक ३ मध्ये १५६५० पुरुष, १३५१७ महिला असे एकूण २९१६८ मतदार ४१ मतदान केंद्रे आहेत, प्रभाग ४ मध्ये १९९४२ पुरुष १६७२४ महिला असे एकूण ३६६६६ मतदार ५० मतदान केंद्रे आहेत, प्रभाग ५ मध्ये १५३७५ पुरुष, १२४२४ महिला असे एकूण २७७९९ मतदार ३७ मतदान केंद्र आहेत, प्रभाग ६ मध्ये १९३८७ पुरुष, १३८२२ महिला असे एकूण ३३२०९ मतदार ४५ मतदान केंद्र आहेत, प्रभाग ७ मध्ये १८०५१ पुरुष, १३९३९ महिला असे एकूण ३१९९० मतदार ४४ मतदान केंद्र आहेत प्रभाग ८ मध्ये १८८३५ पुरुष, १६०८२ असे एकूण ३४९१७ मतदार ४८ मतदान केंद्रे आहेत. सोमवारी दुपारपर्यंत सर्वच मतदान केंद्रांकडे मतदान यंत्रणा रवाना झाली होती. प्रत्येक मतदान बूथ वर ५ निवडणूक कर्मचारी एक शिपाई असणार असून पोलिसांचाही सतर्क बंदोबस्त ठेवला जाणार आहे अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्येक मतदान केंद्रावर ८०० मतदारांचे मतदान होईल, अशी यंत्रणा लावण्यात आली असून महापालिका व निवडणूक आयोगाकडून मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)अनुरुप मतदानाने होणार सुरूवातशहरातील कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतदान यंत्रे निवडणूक साहित्य मतदान पथकांना कार्यालयातून वितरित केले आहे. मंगळवारी सकाळी ७.३० ते सायं ५.३० पर्यंत मतदान आहे. प्रारंभी उमेदवारांच्या प्रतिनिधी समक्ष मतदान यंत्राने अनुरूप मतदान घेऊन मतदान यंत्र सुस्थितीत असल्याची खात्री केली जाईल. त्यानंतर मतदान यंत्रे विहित पद्धतीने सीलबंद करून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल. मतदान आटोपताच मतदान यंत्रे संवैधानिक, असंवैधानिक निवडणूक संबंधित मतदान कार्यालयात मतमोजणीपर्यंत तेथील स्ट्राँगरूमला मतदान यंत्रे ठेवून रूम सीलबंद करण्यात येईल.२०० महिला-पुरुष पोलिसांचा चोख बंदोबस्तभोसरीतील संवेदनशील व गर्दीच्या मतदान केंद्राकरिता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त राहणार आहे. भोसरी पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत एकूण २०० महिला-पुरुष पोलीस सर्व केंद्रावर तैनात असणार आहेत. त्याचबरोबर मतदारांना आमिषे दाखवणे, वाहने पाठवून मतदारांना घेऊन येणे, रकमांचे वाटप, तसेच बूथ हस्तगत करण्यासारखे प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस मतदान केंद्र परिसरात तैनात करण्यात येणार असून, सोमवारी रात्रीपासून गस्त व वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडल्याचे आढळल्यास नागरिकांनी न घाबरता पोलिसांना त्याबाबत कळवावे, असे आवाहन भोसरी पोलिसांनी केले आहे. प्रभाग क्रमांक १८मध्ये ५९ मतदान केंद्र४चिंचवड : प्रभाग क्रमांक १८, १९ व २१च्या मतदान प्रक्रियेची तयारी चिंचवडमधील ब प्रभागातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पूर्ण झाली. आज येथील कार्यालयात मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन मतदान केंद्रावर कार्यरत करण्यात आले.४आज सकाळपासून कार्यालयात कर्मचारी प्रशिक्षणासाठी येत होते. निवडणूक निर्णय अधिकारी रुपाली आवले यांनी प्रभाग कार्यालय व मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. प्रभाग क्रमांक १८ मध्ये ५९ मतदान केंद्रावर मतदान होणार असून, १९ मध्ये ६२ व प्रभाग २१ मध्ये ६४ ठिकाणी यंत्रणा उभारली आहे. या सर्व मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी व पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. आज पोलिसांच्या बंदोबस्तात मतदान यंत्र व सामग्री घेऊन अधिकारी मतदान केंद्राकडे रवाना झाले.प्रभाग १७ मध्ये ५६ मतदान केंद्र४रावेत : मतदानासाठी आवश्यक साहित्य डॉ. हेडगेवार भवन येथून प्रभाग क्र 15, 16, 17 घेऊन मतदान अधिकारी व कर्मचारी केंद्राकडे रवाना झाले. तीन प्रभागांत 165 मतदान केंद्र आहेत. प्रभाग क्र 15,16,17 मधून एकूण 12 जागांसाठी निवडणूक होत आहे. आकुर्डी-निगडी-प्राधिकरण प्रभाग क्र. १५ मध्ये ५४, रावेत-किवळे प्रभाग क्र. 16 मध्ये 55, वाल्हेकरवाडी-बिजलीनगर दळवीनगर प्रभाग क्र 17 मध्ये 56 मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर 6 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  अनेक मतदान केंद्रांमध्ये कर्मचारी मतदानाची तयारी करत असल्याचे दिसत होते. मतदान केंद्राच्या बाहेरही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच मतदान केंद्राच्या बाहेर १०० मीटरच्या परिसरातील दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या जात होत्या.