शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त आयुक्तपदी अच्युत हिंगे यांची नियुक्ती

By admin | Updated: June 2, 2017 02:26 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाची सूत्रे तानाजी शिंदे यांच्याकडून अच्युत हांगे यांनी स्वीकारली. मावळते

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाची सूत्रे तानाजी शिंदे यांच्याकडून अच्युत हांगे यांनी स्वीकारली. मावळते अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची बदली वन व महलूस विभागात करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून बदलीचा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झालेले अच्युत हांगे यांनी यापूर्वी मिरा -भाईंदर महापालिकेच्या मुख्याधिकारीपदी काम केले आहे. त्यांनी नागपूर, भिवंडी, अहमदनगर या महानगरपालिकेत विविध पदांवर काम केले आहे. नागपूर महापालिकेत महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांच्या कार्यकाळातही तीन महिने प्रशासन सेवा केली आहे. हांगे हे बीड जिल्ह्यातील हांगेवाडी येथील आहेत. तानाजी शिंदे हे ३० जून २०१३ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर रुजू झाले होते. पंधरा वर्षांपूर्वीदेखील पिंपरी चिंचवड महापालिकेत त्यांनी सहायक आयुक्त पदावर काम केले आहे. महापालिकेत शासनाने त्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवले होते. प्रशासन अधिकारीपदी आशा राऊतपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासन अधिकारी जयश्री रवींद्र काटकर यांची बदली जुन्नर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी झाली आहे. तर महाबळेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आशा राऊत यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासन अधिकारीपदी बदली केली आहे. महापालिकेत राज्य शासनाने प्रतिनियुक्तीवर पाठविलेले आठ अधिकारी आहेत.