शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांत ‘अ‍ॅण्टिरॅगिंग’ प्रतिज्ञापत्र बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:40 IST

पालकांना ‘अ‍ॅण्टिरॅगिंंग अ‍ॅफेडेव्हिट’ (रॅगिंंग प्रतिबंधक प्रतिज्ञापत्र) सादर करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्ग यांना दिलासा मिळणार आहे.

पिंपरी : विविध प्रवेश परीक्षा झाल्या, त्यानंतर महाविद्यालय प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली. प्रवेश होईपर्यंत कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी धावाधाव केल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला जात असताना, महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच पालकांना ‘अ‍ॅण्टिरॅगिंंग अ‍ॅफेडेव्हिट’ (रॅगिंंग प्रतिबंधक प्रतिज्ञापत्र) सादर करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्ग यांना दिलासा मिळणार आहे.महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी रॅगिंंग करीत असल्याने अनेकदा आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. रॅगिंंगमुळे विद्यार्थी एकाकी पडल्याचे दिसून आले आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांचाही रॅगिंंगच्या माध्यमातून छळ केल्याच्या घटना विविध ठिकाणी घडल्या आहेत. असे अनुचित प्रकार शैक्षणिक संस्थांमध्ये घडू नयेत, यासाठी देशातील सर्व विद्यापीठांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून रॅगिंंग प्रतिबंधक प्रतिज्ञापत्र भरून घेण्यासंबंधीचे आदेश महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे पाऊल महाविद्यालयांनी उचलले आहे.या प्रतिज्ञापत्रात विद्यार्थ्याला त्याची माहिती, त्याचे पालक अथवा पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीची माहिती द्यावी लागते. त्यात दिलेल्या नियमावलीनुसार चांगल्या वर्तणुकीची हमी दिली जाते. तसेच रॅगिंंगच्या कसल्याही कृत्यात सहभागी होणार नाही, असे लिहून द्यावे लागते. अशा प्रकारच्या कृत्यात सहभागी झाल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जावी.महाविद्यालय व्यवस्थापनाकडून प्रवेश रद्द केला जाऊ शकतो,याची जाणीव असल्याचे, तसेच दिलेली माहिती खरी असून नियमावली मान्य आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करणे बंधनकारक आहे.ना हरकत, संमतीपत्रआमच्या पाल्यांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास महाविद्यालय व्यवस्थापनाकडून केल्या जाणाºया कारवाईबद्दल आमची काही हरकत नसेल, असे पालकांचे संमतीपत्रही घेतले जात आहे. काही महाविद्यालयांमध्ये अ‍ॅण्टिरॅगिंंग समितीसुद्धा स्थापन झाल्या आहेत. या समितीकडे विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीची तक्रार आल्यास नियमानुसार पुढील कारवाईची प्रक्रिया केली जाते.अ‍ॅण्टिरॅगिंग कमिटीचा अभावशहरातील बहुतांशी महाविद्यालयांमध्ये अ‍ॅण्टिरॅगिंग समिती स्थापन झाल्या आहेत. काही महाविद्यालयांतील समित्या केवळ कागदावरच आहेत. अनेक महाविद्यालये तर अशी काही समिती असते, याबद्दलच अनभिज्ञ आहेत. अ‍ॅण्टिरॅगिंग प्रतिज्ञापत्रांमुळे त्यांना आता याचे महत्त्व लक्षात आले असून, समिती स्थापन्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.