पिंपरी : आळंदी नगर परिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे हत्याप्रकरणी आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, एकूण तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. विजय चिखले (वय २१, रा. दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.नगरसेवक कांबळे यांची च-होली येथे भरदिवसा धारधार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी संशयित संतोष माने आणि प्रफुल्ल गबाले या दोघांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती. या खुनातील अटक केलेल्या आरोपींची संख्या तीन झाली आहे. याशिवाय या प्रकरणात तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी देहूफाटा येथील काळेवाडी झोपडपट्टीत आकाश जाधव आणि शुभम कांबळे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी बालाजी कांबळे गेले होते. त्या कार्यक्रमावेळी एका व्यक्तीशी वाद झाला. भांडणानंतर बालाजी कांबळे यांना जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. ज्याने धमकी दिली, त्यानेच कांबळे यांचा खून केल्या असल्याचा संशय आहे.
नगरसेवक हत्याप्रकरणी आणखी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 05:31 IST