शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

...आणि मुलींसाठी तालमीचे दरवाजे पुन्हा एकदा उघडू लागले

By admin | Updated: May 7, 2017 02:14 IST

ग्रामीण भागात मुली आणि कुस्ती हे समीकरण जुळणं थोडं अवघडच; मात्र ‘दंगल’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि सर्वत्र मुलींच्या

भानुदास पऱ्हाड /  लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : ग्रामीण भागात मुली आणि कुस्ती हे समीकरण जुळणं थोडं अवघडच; मात्र ‘दंगल’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि सर्वत्र मुलींच्या कुस्तीची चर्चा सुरू झाली. परिणामी, बंद पडलेल्या तालमीचे दरवाजे पुन्हा एकदा उघडू लागले. ग्रामीण भागातील मुली ‘हम भी छोरों से कहीं कम नही’चा नारा लावत कुस्तीच्या आखाड्यात दंड थोपटू लागल्या. एकीकडे हा मर्दानी खेळ लोप पावत चालला असताना, कुस्तीक्षेत्रात मुलींचा सहभाग मुलांप्रमाणेच वाढावा व त्यांनी देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून आळंदीतील जोगमहाराज व्यायाम शाळा या सावित्रीच्या लेकींना खेळाचे धडे देऊन कुस्तीला संजीवनी देण्याचे कार्य करीत आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच दिनेश गुंड यांनी आळंदीत २००४ मध्ये चार मुलींपासून कुस्ती प्रशिक्षण केंद्राची सुरुवात केली आहे. सध्या या प्रशिक्षण केंद्रात राज्यातील विविध जिल्ह्यांमधील तब्बल ७० मुली कुस्तीचे प्रशिक्षण घेत असून, राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये आपल्या खेळाची चुणूक दाखवत आहेत. सुरुवातीच्या काळात कुस्ती प्रशिक्षणासाठी मुली मिळत नव्हत्या; मात्र गुंड यांनी गावोगावी फिरून मुलींना कुस्तीचे महत्त्व पटवून देऊन त्यांना कुस्ती खेळण्याला प्रवृत्त केले. सोबत स्वत:च्या मुलीलाही कुस्तीचे प्रशिक्षण ते देऊ लागले. अल्पावधीतच मुलींचा ओढा कुस्तीकडे वाढू लागला. व्यायाम शाळेतील दर्जेदार प्रशिक्षणामुळे नागपूर येथे २००४ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत चार महिला कुस्तीगीरांनी सुवर्णपदक पटकावून भविष्यातील यशाची रोवलेली मुहूर्तमेढ आजही कायम आहे. भारतीय खेळ प्राधिकरणाची मान्यता असलेल्या जोगमहाराज व्यायामशाळेतील २५ महिला रणरागिणींनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक पटकाविले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत.सब ज्युनिअर आशियाई कुस्ती स्पर्धेत येथील अंकिता गुंडने देशाला सुवर्णपदक, तर मनीषा दिवेकरने आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त करून दिले आहे. याशिवाय अश्विनी मढवी, शीतल साखरे, तेजस्विनी दहिकर यांसारख्या महिला खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन यश संपादन केले आहे. आजपर्यंत व्यायामशाळेतील २८ महिला कुस्तीगीर पोलीस दलात भरती झाल्या असून, प्रियांका बुरुंगले पोलीस उपनिरीक्षक, गीताई कतोर शिक्षण अधिकारी पदावर काम करत आहेत. कुस्तीसारख्या मर्दानी खेळात महिलाही कमी नाहीत, हे हरियानाच्या फोगाट भगिनींनी पटकाविलेल्या पदकांनी सिद्ध झाले आहे. त्यावर ‘दंगल’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तसेच, हिंदी मालिकांद्वारे खेळाची लोकप्रियता वाढवली जात आहे. त्यांमुळे तरुणींचा कुस्ती खेळाकडे कल वाढत चालला असून, पालकही मुलींना खेळाबद्दल प्रोत्साहन देत आह