शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

...अन् ‘त्या’ मातेचा झाला पुनर्जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:51 IST

वेळ सायंकाळी ५.३०. ठिकाण मोशी खडी मशिन परिसर. या परिसरात खेळत असलेल्या तीन वर्षांच्या मुलाला एक गाय शिंगाने मारत आहे, हे दृश्य तिथेच झोपडीत असणाऱ्या  त्या मुलाच्या सहा महिन्यांच्या गरोदर आईने पाहिले. मुलाचा जीव वाचवण्याच्या धडपडीत या माउलीला आपण गरोदर आहोत याचेही भान राहिले नाही.

 भोसरी : वेळ सायंकाळी ५.३०. ठिकाण मोशी खडी मशिन परिसर. या परिसरात खेळत असलेल्या तीन वर्षांच्या मुलाला एक गाय शिंगाने मारत आहे, हे दृश्य तिथेच झोपडीत असणाऱ्या  त्या मुलाच्या सहा महिन्यांच्या गरोदर आईने पाहिले. मुलाचा जीव वाचवण्याच्या धडपडीत या माउलीला आपण गरोदर आहोत याचेही भान राहिले नाही. पळतच जाऊन तिने मुलाला उचलले, पण मुलाकडे झेपावत असलेल्या गाईने आपला मोर्चा या गरोदर मातेकडे वळवला आणि गाईने तिला शिंगांवर घेऊन दूर फेकले. गाईच्या धारदार शिंगांमुळे बाईच्या पोटातील आतडे बाहेर पडले. रक्ताचा सडा पडला अन् क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. बघ्यांचे मन सुन्न करणारी ही घटना घडली.जवळपासच्या नागरिकांनी जखमी अंजू बन्सल (वय २६, मूळ रा. सटाणा, मध्यप्रदेश) हिला तत्काळ वायसीएम रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत सहा वाजून गेले होते. रुग्णालयातील डॉक्टर ड्युटी संपवून घरी परतायच्या तयारीत होते. या घटनेची माहिती कळताच डॉ. कांचन वायकुळे रावेतवरून अवघ्या २० मिनिटांत रुग्णालयात दाखल झाल्या. जखमी महिलेची स्थिती पाहून डॉक्टरांनी तत्काळ उपचारास सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य पाहता महिला आणि पोटातील बाळही सुखरूप वाचवणे ही दुहेरी जबाबदारी डॉक्टरांवर होती.गरोदर मातेच्या पोटातून बाहेर आलेले आतडे, अंतर्गत जखमा व मोठ्या प्रमाणात झालेला रक्तस्राव यामुळे डॉक्टरांसमोर आव्हानच उभे ठाकले. जखमी मातेच्या ईसीजी, सोनोग्राफी अशा आवश्यक तपासण्या करून डॉ. कांचन, सूरज महाडिक, पृथ्वीराज, भूलतज्ज्ञ राजेश गोटे यांनी महिलेवर अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया केली. सुदैवाने महिलेच्या गर्भाशयाला काहीही इजा न झाल्याने त्या मातेचे प्राण तर वाचलेच; शिवाय पोटातील बाळही सुखरूप आहे. हे सर्व शक्य झाले ते केवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील तत्पर डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळेच. अखेर मृत्यू हरला आणि त्या गरोदर मातेचा जणू पुनर्जन्म झाला.वायसीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. यशवंत इंगळे, डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या सहकार्याने आणि तत्परतेमुळे गरोदर माता अंजूचा व तिच्या बाळाचा जीव वाचला. याघटनेमुळे शहरभर वायसीएम रुग्णालय प्रशासनाचे व डॉक्टरांचे कौतुक होत आहे.गरोदर माता अंजू अगदी गंभीर जखमी होत्या; पण तत्काळ आणि योग्य उपचार केल्यामुळेच तिचा व पोटातील बाळाचा जीव वाचू शकला. पोटाच्या बाहेर आलेली आतडी कोणतीही इजा न होता पुन्हा पोटात ढकलणे कसरतीचे होते. रुग्णालयातील सर्व सहकारी व तज्ज्ञांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी झाली.- डॉ. कांचन वायकुळे, वायसीएम रुग्णालयमी जिवंत आहे, माझ्या पोटातील बाळही सुखरूप आहे यावर अजूनही विश्वास बसत नाही. बेशुद्धावस्थेत मला आणण्यात आले. पुन्हा नवा जन्म झाला आहे, असे वाटते. वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाºयामुळेच मी आज जिवंत आहे. - अंजू बन्सल, जखमी गरोदर माता