शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...अन् बिबट्या पडला विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:54 IST

यादववाडी : ग्रामस्थ, पोलीस व वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी केली सोडवणूक

बेल्हा : बेल्हा (ता. जुन्नर) येथील यादववाडी परिसरात भक्ष्याचा पाठलाग करताना सहा वर्षे वयाचा बिबट्या विहिरीत पडला. ग्रामस्थ, पोलीस व वनखात्याच्या कर्मचाºयांनी विहिरीत पिंजरा सोडून बिबट्या पिंजऱ्यात अलगद अडकला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यादववाडी येथे देवराम पिंगट यांची विहीर आहे. शुक्रवारी (दि. ५) पहाटेच्या सुमारास वंदना पिंगट या विहिरीजवळ मोटार चालू करण्यासाठी आल्या असताना त्यांना विहिरीतून आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता बिबट्या मोटारीच्या पाईपला धरून बसलेला पाहिले. त्यांनी घरी जाऊन सांगितले असता घरच्यांनीही खात्री केल्यावर त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी ताबडतोब वनखात्याच्या कर्मचाºयांना ही माहिती दिली.

वनखात्याच्या कर्मचाºयांनी या ठिकाणी येऊन खात्री केली. या ठिकाणी कुत्र्याचा पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडला होता. या विहिरीत एक कुत्रेही मेलेले दिसत होते. वनखात्याच्या कर्मचाºयांनी सर्वप्रथम या पाण्यात पडलेल्या बिबट्यासाठी एका झाडीला चारी बाजूने दोर बांधले. त्यानंतर माणिकडोह येथून पिंजरा आणण्यात आला. त्यानंतर त्या पिंजºयाला चारी बाजूने दोर बांधून पिंजरा पाण्यात झाडीजवळ सोडला. त्यानंतर लगेचच तो बिबट्या अलगदपणे पिंजऱ्यात अडकला. सहा ते सात तास बिबट्या पाण्यातच होता. तो खूपच थकलेला दिसत होता. मात्र पिंजºयात अडकल्यानंतर तो बिबट्या लोकांवर गुरगुरत होता. हा बिबट्या मादी जातीचा असून सहा वर्षे वयाचा आहे.

टॅग्स :leopardबिबट्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड