शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अन् स्वच्छतागृहाचा दरवाजा ठोठावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 01:27 IST

चिमुकला सापडला : वाकडमध्ये गायब झालेल्या मुलाचा तत्काळ शोध लागल्याने पोलिसांसह बालकाच्या नातेवाइकांना आनंद झाला.

वाकड : सार्वजनिक स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडता न आल्याने तब्बल चार तास अडकलेल्या चार वर्षाच्या बालकाला वाकड पोलिसांनी शोधून सुखरूप आई-वडिलांना स्वाधीन केले. दुपारी बाराच्या सुमारास गायब झालेल्या ह्या चिमुरड्याला सुखरूप पाहून त्याच्या पालकांचा जीव भांड्यात पडला.आरोस समाधान मस्के (वय ४, सद्गुरू कॉलनी, वाकड) असे त्या बालकाचे नाव आहे़ सकाळी बाराच्या सुमारास तो घरातून गायब झाला होता़ काही वेळ इकडे तिकडे शोध घेतल्यानंतर त्याच्या आईने वाकड ठाणे गाठून तक्रार दिली़ त्यानंतर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली़ वाकड पोलिसांनी त्याचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केले.

हा संदेश सोशल मीडियावरून व्हायरल होत असताना दुसरीकडे वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी या चिमुरड्याच्या शोध मोहिमेसाठी योजना आखली त्यांनी ९० कर्मचारी व १० पोलीस अधिकारी त्याच्या शोधार्थ पाठवून दिले. सहायक निरीक्षक संतोष घोळवे व पोलीस नाईक अशोक दुधावने हे दोघे सद्गुरू कॉलनी परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृह तपासत असताना त्यांनी एका बंद शौचालयाचा दरवाजा जोराने ढकलला असता तो चिमुरडा आत उभा असल्याचे त्यांना दिसले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड