शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीतील रहदारीत अडकली रुग्णवाहिका; युवतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2023 22:40 IST

उज्वला नामदेव झाडे (वय २१ रा. आळंदी) असे मृत झालेल्या युवतीचे नाव आहे.

- भानुदास पऱ्हाड

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत पोलीस ठाणे ते ग्रामीण रुग्णालयापर्यंतच्या रस्त्यावर बेकायदेशीर रहदारीने झालेल्या अडथळ्यामुळे रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडकली. परिणामी वेळेत उपचार न मिळाल्याने एका २१ वर्षीय युवतीला आपला जीव गमवावा लागला. रविवारी (दि.५) सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली.

उज्वला नामदेव झाडे (वय २१ रा. आळंदी) असे मृत झालेल्या युवतीचे नाव आहे. घराच्या गॅलरीतून आंब्याच्या झाडावरील आंबे काढत असताना उज्वलाचा तोल जाऊन ती जमिनीवर खाली पडली. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. परिस्थिती पाहता तत्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेतून उज्वलाला आळंदीतील ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेने नेण्यात आले. दरम्यान रुग्णालयाच्या रस्त्यावर असणाऱ्या गर्दीमुळे रुग्णवाहिका २० ते २५ मिनीटे अडकून पडली. त्यानंतर रुग्णवाहिका रुग्णालयात नेण्यात आली. मात्र उपचारापूर्वी उज्वलाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

दरम्यान, रात्री उशिरा वायसीएम रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. रुग्णवाहिकेतील मुलांच्या व इतर व्यक्तींच्या माहितीनुसार आळंदी पोलीस स्टेशन जवळील ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या चौकापर्यंत उज्वलाचा श्वासोच्छ्वास सुरू होता. दुर्दैवाने वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्याने उज्वलाला जीव गमवावा लागला अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

आळंदी पोलीस स्टेशन ते आळंदी ग्रामीण रुग्णालय या रस्त्यावर दुतर्फा बेकायदेशीरपणे पार्किंग केलेली दुचाकी वाहने, हातगाड्या, दुतर्फा भाजी विक्रेते व इतर विक्रेते उभे असतात. त्यामुळे या रस्त्यावर प्रवाशांना अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका आणताना कसरत करावी लागते अशी माहिती डॉ. शुभांगी नरवाडे यांनी दिली.

नगरपरिषदेच्या आदेशाला केराची टोपली....  पोलीस ठाणे ते आळंदी ग्रामीण रुग्णालयापर्यंत मुख्य रस्त्यावर भाजी विक्रेते, फळविक्रेते, फेरीवाले आदी बसल्यास तसेच सदर ठिकाणी कोणी वाहने लावल्यास कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल असा आदेश तत्कालीन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी काढला होता. आदेशाचे फलकही त्याठिकाणी बसवण्यात आले होते. परंतु नगरपरिषदेच्या आदेशाला केराची टोपली दाखवून दुतर्फा भाजी विक्रेते इतर विक्रेते बसत आहेत. तसेच बेकायदेशीर वाहनेही लागत आहेत. 

भाजी मंडई शाळा क्र. ४ च्या मैदानावर भरणार...आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीत ग्रामीण रुग्णालयाच्या मार्गावरील भरली जाणारी भाजी मंडई आळंदी नगरपरिषदेच्या शाळा क्र. ४ च्या मैदानावर तात्पुरत्या स्वरूपात भरविण्यात येणार असल्याचे आळंदी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे. 

टॅग्स :Alandiआळंदी