शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

...असेही लाटतात भूखंड

By admin | Updated: September 22, 2015 03:13 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अनेक वर्षांपासून विक्री न झालेल्या भूखंडांवर एखाद्या मंदिराची स्थापना करून तो व त्याच्या आजूबाजूची जागाही निवासासाठी लाटली जात आहे

पिंपरी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अनेक वर्षांपासून विक्री न झालेल्या भूखंडांवर एखाद्या मंदिराची स्थापना करून तो व त्याच्या आजूबाजूची जागाही निवासासाठी लाटली जात आहे. विशेष म्हणजे हे अतिक्रमण एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानेच होत आहेत. भोसरी, पिंपरी व चिंचवड भागातील बहुतांश भूखंड अशा पद्धतीने लाटले गेलेले आहेत. एमआयडीसीत काम करणारे अधिकारी-कर्मचारी आपल्या कामाचा, पदाचा गैरवापर करून एखाद्या विश्वस्त संस्थेला असा भूखंड देतात. येथे त्यांच्याच सांगण्यावरून रातोरात एखादे मंदिर उभे केले जाते. तेथे अतिक्रमणविरोधी पथकाकडून सुद्धा कारवाई करण्याचे धाडस केले जात नाही. याचाच फायदा घेऊन अशाप्रकारे ३, ५, १० गुंठ्यांचे मोठे भूखंड लाटले गेले आहेत. चिंचवडजवळील मोहननगर भागात एमआयडीसीच्या जागेवर अनेक विश्वस्त संस्थांनी व चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली मंदिर बांधण्याचे कारण पुढे करून भूखंंड घेतले गेले. याला लागूनच रहिवासी बांधकामे झाली आहेत. असाच प्रकार संभाजीनगरमध्येही पाहायला मिळत आहे. ट्रस्टच्या व विश्वस्त संस्थेच्या नावाखाली धार्मिक स्थळे उभारली आहेत. शहरातील मोक्याच्या ठिकाणचे कोट्यवधींचे भूखंड लाटले जात आहेत. अनेक वर्षांपासून येथे धार्मिक मंदिरे उभारली आहेत. विश्वस्तांची कार्यकारिणी तयार केली जाते. काही भूखंडांवर उभारलेल्या धार्मिक स्थळांच्या बाजूला तर दुकाने थाटली आहेत. ती भाड्याने देऊन व्यावसायिक वापर होतो.(प्रतिनिधी)