शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंद्यांचा परिणाम होतोय तरुणाईवर, छावा संघटनेचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 01:20 IST

छावा संघटनेचा आरोप : पोलीस आयुक्तालयावर आंदोलन करण्याचा दिला इशारा

पिंपळे गुरव : पिंपरी-चिंचवड शहरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी वाहवत चालली आहे. गेल्या आठवड्यात मटका अड्ड्यावर एकाचा खून होऊनही पोलिसांची अवैध धंद्याविरोधात मोहीम थंडच आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयानंतर अवैध धंद्यांविरोधात कारवाई कडक होणे आवश्यक आहे अन्यथा छावा मराठा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष राम जाधव यांनी दिला आहे.

संघटनेतर्फे पोलीस आयुक्तांना दिलेल्या पुनर्निवेदनात म्हटले आहे, की शहर व उपनगरांतील अवैध धंदे रोखण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यासंदर्भात २० जानेवारी रोजी निवेदन दिले होते. मात्र, प्रजासत्ताक दिनानंतरही अवैध धंदे जोमात सुरूच आहेत. हे असेच सुरू राहिले, तर शहर व उपनगरांमध्ये गुन्हेगारी फोफावल्याशिवाय राहणार नाही. पोलीस आयुक्तांनी अवैध धंद्यांविरोधातील कारवाई तीव्र करण्याची वेळ आली आहे. नव्याने पोलीस आयुक्तालयाची निर्मिती होऊनही गुन्हेगारी अवैध धंदे तसेच गुन्हेगारी रोखण्यात पोलीस आयुक्तांना अपयश आले आहे. आयुक्तांनी सुरुवातीला अवैध धंद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे नागरिकांमधून आनंदाचे वातावरण होते. शहर परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.गेल्याच आठवड्यात दापोडी येथे पूर्ववैमनस्यातून एकाचा खून झाला. हा खून पूर्ववैमनस्यातून झालेला असला, तरी तो मटका अड्ड्यावर झालेला आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अवैध धंद्यांची ठिकाणेच गुन्हेगारीचे अड्डे बनलेले आहेत, हे सर्वांना माहीत आहेच. परिसरात महिलांना घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे.४गुन्हेगारी आटोक्यात राहावी, अवैध धंद्यांवर नियंत्रण हवे. हा स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्मितीमागील उद्देश होता. हा उद्देश सफल व्हावा, ही अपेक्षाही राम जाधव यांनी व्यक्त केली.४प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. किराणा मालाची दुकाने थाटल्याप्रमाणे जुगाराचे आणि मटक्याचे अड्डे सुरू झाले आहेत. वसूलदार म्हणून नेमलेले पोलीस या अवैध धंद्यांना परवानगी देत सुटले आहेत. लाखोंची वसुली चालू आहे, असा आरोपही रामभाऊ जाधव यांनी निवेदनात केला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड