शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बीआरटी स्थानके बनली मद्यपींची आश्रयस्थाने

By admin | Updated: June 1, 2017 02:05 IST

शहरातील वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी आखलेला बीआरटी प्रकल्प अद्यापही अपूर्ण स्थितीतच आहे. प्रशासनाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कनिगडी : शहरातील वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी आखलेला बीआरटी प्रकल्प अद्यापही अपूर्ण स्थितीतच आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे हे बीआरटी मार्ग व स्थानके धुळखात पडून आहेत. यामुळे शहरात वाहतूककोंडीच्या घटना वांरवार घडत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या शहरातील बीआरटी मार्गाची वापरण्यापूर्वीच दुरवस्था झाली आहे. मात्र, याकडे लक्ष देण्यास ना महापालिका प्रशासनाला वेळ आहे ना पोलिसांना. यामुळे बीआरटी मार्गाचा वापर सध्या वाहनधारक पार्किंगसाठी करीत आहेत, तर मद्यपी व भिकाऱ्यांची तर आश्रयस्थान बनले आहे. आसपासच्या वस्त्यामधील नागरिकांकडून कपडे वाळत घालण्यासाठी बीआरटी मार्गावरील लोंखडी कठड्यांचा वापर होत आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यास बाधा पोहचत आहे. शहरातील निगडी, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी येथील बीआरटी स्थानके सध्या भिकाऱ्यांची आश्रयस्थाने बनली आहे. या ठिकाणी शहरातील मुख्य चौकात भिक्षेकरी अढळून येतात. मात्र, या भिकाऱ्यांना कोणीच हटकत नसल्यामुळे बीआरटी स्थानके भिकाऱ्यांची निवासस्थाने बनली आहेत. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. बीआरटी मार्गावरील सुरक्षारक्ष फक्त नावापुरतेच बीआरटी मार्गावर वाहने लावण्यास मनाई असतानाही हे सुरक्षा कर्मचारी फक्त बघ्याची भूमिका घेतात. व हेच सुरक्षारक्षक आपलीच वाहने बीआरटी मार्गावर लावतात. यामुळे अनेक वाहनधारक यामुळे वाहने या मार्गावर बिनधास्तपणे पार्क करतात. दुरवस्था : नियोजनाअभावी प्रकल्प धुळखात प्रचंड पैसे खर्च करून बीआरटी बस सेवेसाठी निगडी जकातनाका येथे बीआरटीचे स्थानक बांधण्यात आले. मात्र, हे बीआरटी स्थानक वापराविणा धुळखात पडून आहे. मात्र, हे बीआरटी स्थानक दिवसा व रात्रीसाठी मद्यपींचा अड्डा बनले आहे. या ठिकाणी मद्यपी बिनधास्तपणे मद्य प्राशन करताना अढळून येतात. तर बहुतांश मद्यपी निद्रावस्थेत असतात. यामुळे या बीआरटी स्थानकाचा वापर मद्यपी करीत आहेत़बीआरटीचा वापर पार्किंगसाठी शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बीआरटी मार्गांची निर्मिती करण्यात आली. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे बीआरटी मार्ग धुळखात पडून आहेत. बीआरटी मार्गावर वाहन लावण्यास बंदी असताना या मार्गांचा सध्या वापर वाहनधारक आपल्या दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग करण्यासाठी होत आहे. मात्र, याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना वाहतूक विभागाचे.अपघातांना आमंत्रण देणारे कठडे बीआरटी मार्ग व मुख्य रस्ता यांच्या मधोमध सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी जाळ्यांचे कठडे बांधण्यात आले आहेत. परंतु, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा धक्का लागल्याने काही लोंखडी जाळ्या मोडल्या आहेत, तर काही जाळ्यांचे लोखंडी गज मार्गावर आल्याने अपघात होण्याची शक्यता आहे़ यामुळे या लोखंडी जाळ्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे. प्रकल्प बासनात; कोट्यवधी रुपये पाण्यातकोट्यवधी रुपये खर्च करून मोठा गाजावाजा करत सुरू केलेला बीआरटी प्रकल्प बासनात गुंढाळण्यात आल्याची आता केवळ औपचारिक घोषणाच बाकी आहे. सामान्य नागरिकांच्या करातून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्याचा अधिकार पालिकेला कुणी दिला? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.