शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीला देणार २ लाख लिटर पाणी

By admin | Updated: May 11, 2017 04:43 IST

महापालिकेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आळंदीला दररोज दोन लाख लिटर पाणी पुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिकेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आळंदीला दररोज दोन लाख लिटर पाणी पुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. संत ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गेल्या काही दिवसांपासून आळंदीकरांना दूषित पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून आळंदीसाठी पिण्यासाठी पाणीपुरवठा करावा, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. आळंदी आणि परिसरात सध्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामुळे आळंदीकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. वास्तविक पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक वसाहती आणि महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इंद्रायणीच्या प्रदूषणात वाढ झाली. तेच पाणी पुढे आळंदीत बांधलेल्या बंधाऱ्यामध्ये जाते. या पाण्यावर प्रक्रिया करून नगर परिषद आळंदीकरांना पुरवठा करीत आहे. मात्र, पाणी प्रक्रिया प्रकल्प सदोष असल्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी केली होती. त्याला महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच पाणीपुरवठा विभागाला दररोज दोन लाख लिटर पाणी आळंदीला द्यावे अशा सूचना दिल्या आहेत.