पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षयरोग तपासणी उपकरण खरेदी प्रकरणातील अनियमितता व मशिन विनावापर पडून राहण्यास जबाबदार असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला या प्रकरणाची द्विसदस्यीय समितीने चौकशी केली. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार, तत्कालीन अधिकारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी, डॉ. राजशेखर अय्यर, डॉ. आनंद जगदाळे या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले. हे अधिकारी निवृत्त झाल्याने त्यांच्या विभागीय चौकशीच्या कार्यवाहीसाठी आयुक्तांना नियुक्त करावे, असा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याचा ठराव महासभेने मंजूर केला. त्यानंतर आयुक्तांनी राज्य सरकारला पत्र पाठवून या ठरावाची अंमलबजावणी योग्य होणार नाही, असे स्पष्ट करून हा ठराव विखंडित करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. महासभेचा ठराव डिसेंबर २०१५ मध्ये शासनाने विखंडित केला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करावी, असा आदेश महापालिकेला दिला आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी डॉ. अय्यर आणि डॉ. जगदाळे यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहे, तर डॉ. कुणचगी यांचे निधन झाले आहे. (प्रतिनिधी)> वैद्यकीय अधीक्षकासह सहा जणांची होणार खातेनिहाय चौकशीपिंपरी : निष्काळजीपणामुळे रुग्णाला पाय गमवावा लागल्याच्या प्रकरणात दोषी आढळलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांसह सहा जणांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी दिले आहेत.वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख, सर्जन डॉ. संजय विजय पाडाळे, भूलतज्ज्ञ डॉ. राजेश भाऊसाहेब गोरे, सिस्टर इनचार्ज सात्वराज जॉन हेडरिना, स्टाफ नर्स जयश्री राजेंद्र कुंभार, वर्षा चंद्रकांत राऊत अशी खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश दिलेल्यांची नावे आहेत. शस्त्रक्रिया आणि त्यामध्ये झालेल्या निष्काळजीपणाची चौकशी करण्यासाठी पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधील पाच डॉक्टरांची समिती नेमली होती. समितीने १८ मार्च २०१६ला अहवाल सादर केला. या घटनेचे पडसाद विधानसभा अधिवेशनातही उमटले होते. त्यामुळे आयुक्त राजीव जाधव यांनी खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले.
अय्यर, जगदाळे यांची होणार विभागीय चौकशी
By admin | Updated: April 23, 2016 00:40 IST