शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अहवाल वाचनानंतर दोषींवर कारवाई करणार

By admin | Updated: June 1, 2017 02:02 IST

गॅस शवदाहिनी घोटाळ्यासंदर्भात त्रिसदस्यीय चौकशी समितीने तयार केलेला अहवाल स्थायी समिती पदाधिकाऱ्यांना पाहिला मिळाला

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : गॅस शवदाहिनी घोटाळ्यासंदर्भात त्रिसदस्यीय चौकशी समितीने तयार केलेला अहवाल स्थायी समिती पदाधिकाऱ्यांना पाहिला मिळाला. चौकशी अहवालाचे सविस्तर वाचन केल्यानंतरच दोषींवर उचित कारवाई करू, अशी स्पष्टोक्ती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. सांगवी येथील स्मशानभूमीत पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी बसविण्यात आली आहे. या कामाबाबत तक्रारी आल्या आहेत. त्यावर आर्थिक व तांत्रिक सल्ला देण्यासाठी पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) तज्ज्ञांची नेमणूक करण्याचा आणि त्यांना आगाऊ १ लाख ३६ हजार ८०० रुपये देण्याचा प्रस्ताव विषय पत्रिकेवर होता. या प्रस्तावास सभापती सीमा सावळे, नगरसदस्या आशा शेंडगे यांनी विरोध केला. त्या म्हणाल्या, सांगवीतील स्मशानभूमीबाबत आपण तक्रार केली होती. तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या तक्रारींची दखल घेत त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. त्यात सहआयुक्त दिलीप गावडे, मुख्य लेखापाल राजेश लांडे आणि सहशहर अभियंता आयुबखान पठाण यांचा समावेश होता. या समितीने २२ नोव्हेंबर २०१६ रोजी अहवाल सादर केला होता. त्यातील निष्कर्षाच्या अनुषंगाने त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक सल्ला घेण्याचे तत्कालीन आयुक्तांनी ठरविले. तंत्रज्ञान व दराबाबत खात्री करण्यासाठी २८ लाख १७ हजारांचा खर्च येईल, असे मुंबईतील आयआयटीने कळविले. हे शुल्क वाजवी वाटत नसल्याने आयुक्त हर्डीकर यांनी सीओईपीकडे विचारणा केली. प्रा. बी. जी. बिराजदार व प्रा. एस. एन. सपाली यांनी सहमती दर्शविली. १ लाख ३६ हजार ८०० रुपये सल्लागार शुल्क आकारू,असे सांगितले.