शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

वाहन प्रवेशकर आकारणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:07 IST

हन प्रवेशशुल्क वसुली येत्या गुरुवारपासून (दि. ३) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या विशेष बैठकीत घेण्यात आला.

देहूरोड : वाहन प्रवेशशुल्क वसुली येत्या गुरुवारपासून (दि. ३) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या विशेष बैठकीत घेण्यात आला. हद्दीतून ये-जा करणाºया वाहनांच्या वाहन प्रवेशशुल्क व मासिक पास दरात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. तसेच स्थानिक व्यावसायिक वाहनांना मासिक पास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.सोमवारी सायंकाळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ओ. पी. वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बोर्डाच्या विशेष बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, बोर्ड सदस्य रघुवीर शेलार, सारिका नाईकनवरे, हाजीमलंग मारिमुत्तू, ललित बालघरे, अ‍ॅड. अरुणा पिंजण, कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत, विभागीय प्रशिक्षण विभागाचे व्यवस्थापक नरेंद्र महाजनी, जकात विभागाचे चंद्रकांत कुºहाडे आदी उपस्थित होते.देशात वस्तू व सेवा कर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने रक्षा संपदा विभागाच्या ३० जूनच्या पत्रानुसार देहूरोड कॅन्टोन्मेन्ट बोर्डाकडून आकारण्यात येणारा जकातकर, पारगमन शुल्क व वाहन प्रवेशशुल्क वसुली एक जुलैपासून बंद करण्याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाने कार्यवाही केली होती. बोर्डाच्या हद्दीतील पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील निगडी व शेलारवाडी, तसेच कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गवरील शितळानगर (मामुर्डी), देहूगाव ते देहूरोड रस्त्यावरील झेंडेमळा, तसेच देहूरोड रेल्वे स्थानकाजवळ असणारा जकात नाका असे सर्व पाचही जकात नाके बंद करण्यात आले होते. सर्व जकात नाक्यांवर दर्शनी भागात जकात नाकी बंद झाल्याचे मोठे फलक लावले होते. मात्र रक्षा संपदा विभागाच्या महानिर्देशक कार्यालयाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डाला शनिवारी (दि. २९) प्राप्त झालेल्या एका पत्रानुसार केंद्रीय महसूल विभागाने संरक्षण विभागास दिलेल्या खुलाशानुसार वस्तू व सेवा कर लागू झाला असला, तरी कॅन्टोन्मेंट कायद्यातील (२००६ कलम ६७ ई नुसार) तरतुदीनुसार वाहन प्रवेशशुल्क वसुली करता येते.वाहन प्रवेशशुल्कात वाढ करण्यास, तसेच मासिक पास दरात वाढ करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.