शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत सुविधांपासून वंचित राजमाची, स्वातंत्र मिळून ७० वर्षांनंतरही प्रश्न ‘जैसे थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 03:13 IST

पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा व खंडाळा या शहरापासून अवघ्या २० किमी अंतरावर राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या राजमाची हे गाव देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत असताना आजही पिण्याचे पाणी, रस्ते व वीज या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेले आहेत. शासनाची उदासीनता व स्थानिक नेत्यांचा पाठपुराव्याचा अभाव ह्या गोष्टी गावाच्या दुर्लक्षितपणामुळे अधोरेखित होत आहे.

लोणावळा : पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा व खंडाळा या शहरापासून अवघ्या २० किमी अंतरावर राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या राजमाची हे गाव देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत असताना आजही पिण्याचे पाणी, रस्ते व वीज या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेले आहेत. शासनाची उदासीनता व स्थानिक नेत्यांचा पाठपुराव्याचा अभाव ह्या गोष्टी गावाच्या दुर्लक्षितपणामुळे अधोरेखित होत आहे.स्वराज्याचे टेहाळणी किल्ले अशी ओळख असलेल्या राजमाची येथील श्रीवर्धन व मनोरंजन या दोन किल्ल्यांच्या पायथ्याला राजमाची हे दोनशे ते सव्वादोनशे नागरीवस्ती असलेले गाव आहे. गावात २३ घरे आहेत़ तर शेजारी असलेल्या वळवंडे गावात सात ते आठ घरे व फणसराई येथे पंधरा ते वीस आदिवासी लोकांच्या झोपड्या आहेत. राजमाची किल्ला हा ट्रेकर व पर्यटक यांचे आकर्षण असल्याने वर्षभर याठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते. तोच येथील नागरिकांचा रोजगाराचा मार्ग असल्याने आलेल्या पर्यटकांची घरगुती पद्धतीने राहण्याची व जेवणाची सोय करत दोन पैसे हे ग्रामस्थ कमवितात. रस्त्याअभावी होणारी गैरसोय टाळण्याकरिता मावळचे आमदार संजय भेगडे यांच्या निधीमधून या गावाला जाणाºया कच्च्या दगडी व माताड रस्त्यावर चार मोठे पूल व तीन साकव पूल बांधण्यात आले आहेत.गाव अंधारातच : अद्यापपर्यंत वीज पोहोचली नाही]मागील काळात पंचायत समितीच्या माध्यमातून गावाला सौरदिवे देण्यात आले होते. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत बेसाल्ट पद्धतीचा दगड असल्याने या भागात विहिरीला अथवा बोरिंगला देखील पाणी लागत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. गावाच्या खालील बाजूला असलेल्या एका तळ्यातून अथवा किल्ल्यावर असलेल्या खळग्यांमधून नागरिकांना पिण्याचे पाणी आणावे लागते. गावामध्ये सात सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. मात्र ग्रामपंचायतीला गावातील नागरिकांचा मिळणारा कर वगळता कसलेही उत्पन्न नसल्याने गावात कोणतीही विकासाची कामे झालेली नाहीत. गावात आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शंभर टक्के कर वसुली केली जाते. तंटामुक्त गाव, पर्यावरणपूरक गाव असे अनेक पुरस्कार या गावाने मिळविले आहेत. या परिसरात वन विभाग रस्ता करण्यास मान्यता देत नसल्याने येथे अद्याप पक्के रस्ते झालेले नाहीत. शहरापासून २० किमी अंतरावर हे गाव असूनही येथे अद्याप वीज पोहोचलेली नाही. आजही गावात तेलाचे किंवा रॉकेलचे दिवे लावले जातात.रस्ता बनविण्यात आडकाठी नसावीवन विभागाच्या आडमुठेपणामुळे राजमाची गावाचा रस्ता व पर्यायाने विकास रखडलेला आहे. राजमाची गावाला रस्ता झाल्यास त्याच्या मागोमाग या परिसराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र या ठिकाणी रस्ता झाल्यास स्थानिकांच्या पर्यटन व्यवसायावर गदा येईल, अशी येथील काही नागरिकांची धारणा असल्याने गावातील काही मंडळींचा देखील रस्ता होण्यास विरोध आहे.या दुहेरी पेचाचा त्रास मात्र निष्पाप ग्रामस्थांना भोगावा लागतो आहे. गावात कोणी आजारी पडले अथवा काही घटना घडल्यास मोठी समस्या निर्माण होते. पावसाळ्यात तर या गावात गाडी जाऊ शकत नसल्याने नागरिकांना चार महिन्यांचा किराणा घरात भरावा लागतो. कोणी आजारी पडल्यास झोळी करुन त्याला लोणावळ्यात घेऊन यावे लागते़ गावाच्या या समस्याचा विचार करता राजमाची गावाचा रस्ता होण्यास किमान कोणी आडकाठी करू नये अशी भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड