शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

सल्लागारांबद्दल आगपाखड

By admin | Updated: May 6, 2015 06:04 IST

शहरातील विकासकामांसाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येते. मात्र, कामे कासवाच्या गतीने होत आहेत. सल्लागारांना एकूण विकासकामांच्या ३.३५ टक्के दराने कामे दिली जातात.

पिंपरी : शहरातील विकासकामांसाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येते. मात्र, कामे कासवाच्या गतीने होत आहेत. सल्लागारांना एकूण विकासकामांच्या ३.३५ टक्के दराने कामे दिली जातात. सर्व कामांची जबाबदारी सोपवूनही सल्लागारांकडून कामे होत नसल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांनी महापालिका प्रशासनाला केला आहे. अध्यक्षस्थानी अतुल शितोळे होते. तसेच, संभाजीनगर मॉडेल वॉर्ड, रेल्वे ओव्हर ब्रीज, घरकुल, बीआरटी रस्ते, तारांगण, हॉस्पिटल उभारणी आदी मोठ्या कामांसाठी सल्लागारांची नेमणूक केलेली आहे. निविदापश्चात व निविदापूर्वीची कामे सल्लागार पार पाडतात. कामांच्या देखभाल दुरुस्तीच्या सर्व कामांच्या जबाबदारीचा विसर सल्लागारांना पडलेला आहे, असे स्थायीच्या सदस्यांनी आयुक्तांना परखडपणे सुनावले. अर्थसंकल्पातील विकासकामे कधी होणार, या प्रतीक्षेत सदस्य आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी कामे व्हावीत, अशा सूचना सदस्यांनी केल्या. फायली वेळेवर येऊनही आयुक्त सह्या करीत नाहीत. याबाबत स्थायी सदस्यांनी संताप व्यक्त केला.महापालिकेच्या शाळांमध्ये तसेच महापालिकेच्या मिळकतीच्या ठिकाणी ७०० सुरक्षारक्षक पुरविण्याची निविदा चार महिन्यांपूर्वीच मंजूर झाली होती. मात्र, आयुक्तांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. प्रस्ताव मंजूर असूनही कामे सुरू होत नाहीत. यामुळे स्थायी सदस्यांनी आयुक्तांवर आगपाखड केली. यावर आयुक्त म्हणाले, ‘‘कामाचे स्वरूप मोठे असल्याने याबाबत ठेकेदारांच्या कामाच्या वाटाघाटी सुरू आहेत.’’सर्व ठेकेदारांना कामे देण्यात येणार आहेत, असे कानी पडताच स्थायी सदस्य चपापले. स्थायी सभेत अजूनच गोंधळ उडाला. सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांनी याबाबत खुलासा दिला, हे कामकाज १० कोटी रुपयांचे आहे. या कामकाजात आयुक्तांनी लक्ष घालणे चुकीचे आहे, अशी चर्चा स्थायी सदस्यांनी केली. या वेळी स्थायी सदस्य विनायक गायकवाड, प्रसाद शेट्टी, धनंजय आल्हाट, सविता साळुंके, कै लास थोपटे, अनिता तापकीर उपस्थित होते.(प्रतिनिधी)४ठेकेदारांना बोलावून कामांची वाटाघाटी केल्याचे आयुक्तांनी बोलण्याच्या ओघात सांगितले. आयुक्तांनी वाटाघाटीची कबुली दिल्यामुळे स्थायी सदस्यांनी आयुक्तांना फै लावर घेतले. आयुक्त ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार पालिका चालवणार का? ठेकेदारांचा आयुक्तांशी थेट संबंध कसा येतो? असे प्रश्नही स्थायी समिती सदस्यांनी उपस्थित केले आहेत.