शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे बचतीवर प्रतिकूल परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:12 IST

ग्राहक आणि व्यावसायिकांची विविध करांच्या जाचातून सुटका व्हावी, तसेच करप्रणालीत सुसूत्रता यावी यासाठी जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आला.

पिंपरी : ग्राहक आणि व्यावसायिकांची विविध करांच्या जाचातून सुटका व्हावी, तसेच करप्रणालीत सुसूत्रता यावी यासाठी जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आला. नवीन कररचनेमुळे देशाच्या महसुलात वाढ झाली. परंतु केवळ कर वाढवून देशाचे दरडोई उत्पन्न वाढणार नाही. त्यासाठी लोकांच्या बचतीचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. कराच्या अधिकच्या भारामुळे अलीकडे लोकांच्या बचतीचा टक्का घसरला आहे, असे मत पिंपरी-चिंचवड चेंबर आॅफ इंडस्ट्रीज कॉमर्स, सर्व्हिस अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अप्पासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.संघटनेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. शिंदे बोलत होते. या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रेमचंद मित्तल, सचिव रंगनाथ पाटील, खजिनदार विनोद बन्सल, नरेश अगरवाल आदी उपस्थित होते. प्राप्तिकर भरताना सध्या ज्या अडचणी येत आहेत, त्याच अडचणी जीएसटी भरतानादेखील येणार आहेत. त्यासाठी केंद्राने जीएसटीचे राज्य आणि केंद्र असे विभाजन करायला हवे. ज्या गोष्टी पूर्वी करमुक्त होत्या, त्यांनादेखील जीएसटीच्या बंधनात अडकविण्यात आले आहे, असेही शिंदे म्हणाले.नागरिकांनी केलेल्या बचतीवर सरकारला मोठ्या प्रमाणात निधी मिळत असे. परंतु जीएसटीमुळे कराचा अधिभार वाढल्याने बचत कमी झाली आहे. नागरिकांकडील बिनव्याजी भांडवल कमी होत आहे, तर दुसरीकडे केंद्राचा महसूल काही प्रमाणात वाढत आहे. ही तफावत चुकीची असून, याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याचा मोठा धोका असल्याचे उपाध्यक्ष प्रेमचंद मित्तल म्हणाले. एखादी वस्तू तयार करण्यापासून ते त्या वस्तूचा कचरा होईपर्यंत ती वस्तू चार प्रकारच्या करांमधून जाते. एका वस्तूला चार वेळा कर देणे परवडणारे आहे का, असा सवाल या वेळी करण्यात आला. बांधकाम क्षेत्रातील साहित्यावर लावलेला जीएसटी कमी करावा, तसेच अवाढव्य वाटणाºया जीएसटीचे योग्य अवलोकन करून त्यात बदल करण्याचे आवाहन केले.