शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवडमधील तरुणाचा साहसी विक्रम

By admin | Updated: February 2, 2015 02:16 IST

ताशी १४० ते १५० किलोमीटर असा वेगाशी सामना करणारी दुचाकी. त्यावर स्वार असलेला ३० वर्षांचा विनिल खारगे हा साहसी तरुण

मिलिंद कांबळे,  पिंपरीताशी १४० ते १५० किलोमीटर असा वेगाशी सामना करणारी दुचाकी. त्यावर स्वार असलेला ३० वर्षांचा विनिल खारगे हा साहसी तरुण. भारतीय रस्त्यावर सुसाट वेग कायम ठेवत तब्बल २ हजार १३७ किलोमीटर अंतर त्याने कापले केवळ २४ तासांमध्ये. पुणे ते चेन्नईतील वेलोरे आणि पुन्हा पुणे असा तुफानी वेगवान दुचाकी प्रवास अविश्वनीय आणि आश्चर्यचकित करणारा असाच आहे. कमी कालावधीत सर्वांधिक अंतर दुचाकीवरुन कापण्याचा हा राष्ट्रीय नवा विक्रम आहे. यापूर्वी त्याने दुचाकीवरुन ३६ तासांमध्ये २ हजार ५०० किलोमीटर कापण्याचा विक्रम नोंदविला गेला आहे. उद्योगनगर, चिंचवडमधील विनिल संगणक कंपनीत कामास असून बसने ये- जा करतो. त्याच्याकडे दुचाकी नाही हे एक आश्चर्य आहे. मात्र, तुफान वेगात दुचाकी चालविण्याचे कौशल्य आणि चपळाई त्याच्याकडे नेत्रदिपक आहे. मामाच्या मुलाची दुचाकी वापरत त्याने हा विक्रम नोंदविला आहे. शुक्रवारी (दि. ३० जानेवारी) दुपारी ३ ला त्याने ताथवडे, चिंचवड येथून दुचाकीस ‘स्टार्ट’ केली. कर्नाटक, हुबळी, बंगलुर यामार्गे चेन्नईतील वेलोरे येथे पोहचला. हे १ हजार ६८ किलोमीटरचे अर्धे अंतर त्याने पार केले. तेथे तो शुक्रवारी रात्री ३.२५ ला पोहचला. तेथून पुन्हा पुण्याचा दिशेने प्रवास सुरू झाला. पुन्हा याच मार्गाने दुचाकी सुसाट पळवित तो शनिवारी (दि. ३१ जानेवारी) दुपारी २ वाजून ५३ मिनिटाने पुण्यात पोहचला. त्यानंतर १५ मिनिटाने म्हणजे ३ वाजून ८ मिनिटास चिंचवडच्या प्रारंभस्थळावर होता. हुबळीत अद्याप एक पदरी मार्ग असल्याने थोडा त्रास जाणवला. बंगलुरला शुक्रवारी रात्री ११.३० पर्यत गाठण्याचे लक्ष्य होते. मात्र, तेथे १२.४५ ला पोहचल्याने विक्रमाची कालावधी गाठणे अशक्य असल्याची भिती निर्माण झाली होती. मात्र, पुढील टप्प्यात तो वेळ आणि अंतर वायू वेगात कापले. असाच प्रसंग परतीच्या मार्गावर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर होता.