शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन-शाळांच्या वादात रखडले प्रवेश

By admin | Updated: April 2, 2016 03:35 IST

आरटीई २५ टक्के परतावा व काही शाळांचा आरटीई प्रवेशास नकार असल्याने शिक्षण मंडळ प्रशासनाने शाळांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे काही शाळांची मान्यता रद्द होण्याची

पिंपरी : आरटीई २५ टक्के परतावा व काही शाळांचा आरटीई प्रवेशास नकार असल्याने शिक्षण मंडळ प्रशासनाने शाळांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे काही शाळांची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. आरटीई प्रवेशासाठी युडायसच्या रिपोर्टप्रमाणे एकूण १५० शाळा पात्र आहेत. अद्यापपर्यंत १५० शाळांपैकी १२ शाळांनी आरटीई २५ टक्के आरक्षणासाठी वेबसाइटवर नोंद केलेली नाही. त्यामुळे पालकांची मात्र प्रवेशासाठी धावपळ उडाली आहे. पालकवर्ग मात्र आरटीई प्रवेशासाठी प्रशासनाकडे चौकशी करीत आहेत. शहरातील १० ते २० हजार पालक आरटीई प्रवेशाकडे डोळे लावून बसले आहेत. इकडे मात्र प्रशासन, विविध संघटना, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये वाद सुरू आहेत. प्रवेशासाठी एप्रिल उजाडला, तरीही शाळा नोंदणीच पूर्ण नाही. आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी शाळा नोंदणी १६ ते २२ मार्चपर्यंत ठेवण्यात आली होती. त्यानंतर एक आठवडा पुन्हा २४ एप्रिल पर्यंत शाळा नोंदणीची मुदत वाढविण्यात आली. त्यानंतर त्वरित विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू केले जाणार होते. मात्र, अद्यापपर्यंत शाळा नोंदणीच पूर्ण झालेली नसल्याने आरटीई २५ टक्के प्रवेशास सुरुवात झाली नाही. (प्रतिनिधी)२०१३-१४ या वर्षातील आरटीईचा परतावा चार महिन्यांपूर्वी मिळाला आहे. मात्र, या वर्षामधील ३४ टक्के परतावा बाकी आहे. तसेच २०१४-१५ या वर्षातील ४० टक्के रक्कम मिळाली आहे. उर्वरित परतावा शिल्लक आहे. याबद्दल शासनाने अद्यापपर्यंत काहीच ठोस माहिती न दिल्याने आरटीई शाळा प्रवेश केलेला नाही. वेबसाइटही वारंवार बंद असते.- राजेंद्र दायमा, उपाध्यक्ष, इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन दोन ते तीन दिवसांत शाळा नोंदणी पूर्ण होईल. त्यानंतर त्वरित आरटीई प्रवेश सुरू होतील. याबाबत आयुक्तांसोबत बैठक झाली आहे. शाळांचा शिल्लक आरटीई परतावा शाळांसोबत बैठक घेऊन तो विषय सोडविण्यात आला आहे. - बी. सी. कारेकर, प्रशासन अधिकारी