शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानक समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: December 23, 2016 00:37 IST

येथील पीएमपी बस स्थानकात अनेक समस्या आहेत. अतिक्रमण, रिक्षाचालकांचा वेढा यामुळे या ठिकाणी वारंवार किरकोळ अपघात होत

निगडी : येथील पीएमपी बस स्थानकात अनेक समस्या आहेत. अतिक्रमण, रिक्षाचालकांचा वेढा यामुळे या ठिकाणी वारंवार किरकोळ अपघात होत आहेत. येथील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.पुणे-मुंबई महामार्गावर हे स्थानक आहे. या ठिकाणाहून विविध मार्गांवर बस जातात. विविध शाळा, कॉलेज या भागात असल्याने पुण्याहून तसेच शहरातून अनेक विद्यार्थ्यांची या ठिकाणी ये-जा सुरू असते. येथे मोठ्याप्रमाणात गर्दी असते. आयटीनगरीकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी असते. येथील बसशेडची जागा अपुरी आहे. बसशेडसमोर बस उभ्या केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना बस दिसत नाहीत. त्यामुळे बस पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ होते. यामुळे अनेक वेळा किरकोळ अपघात होतात. या ठिकाणी असणारे वेळापत्रकही अडचणीत लावण्यात आले आहे. ते वेळापत्रक दिसत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास होतो. येथील अतिक्रमण हा चर्चेचा विषय आहे. बसस्थानकासमोर विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद होतो. या ठिकाणी येणारे ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे अरुंद रस्ता पुन्हा अरुंद होतो. रिक्षाचालक रिक्षा रस्त्यावर उभ्या करतात. ते बसचे प्रवासी राजरोसपणे पळवून नेतात. त्यामुळे पीएमपीच्या उत्पन्नावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. पण या प्रकाराकडे कोणीच गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे रिक्षाचालकांचे फावते. अशीच परिस्थिती भोसरीकडे जाणाऱ्या गाड्यासाठी उभारण्यात आलेल्या थांब्याची आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भिकाऱ्यांचा वावर असतो. बराच वेळा अनेक वस्तू चोरण्याचे प्रकार घडतात. तसेच बसमध्ये बसताना पाकीट मारणे, मोबाईलची चोरी करणे अशाही घटना घडल्या आहेत. या ठिकाणी पोलिसाची नियुक्ती करावी अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. परंतु त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)