शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार

By admin | Updated: November 6, 2016 04:26 IST

नव्याने खरेदी केलेल्या वाहनांची योग्य प्रकारे पाहणी न करता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे पासिंग केले जात आहे. वितरकांशी असलेले हितसंबंध जपले जात असल्याने जुजबी कागदपत्रे

पिंपरी : नव्याने खरेदी केलेल्या वाहनांची योग्य प्रकारे पाहणी न करता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे पासिंग केले जात आहे. वितरकांशी असलेले हितसंबंध जपले जात असल्याने जुजबी कागदपत्रे पाहूनच अधिकारी पासिंगसाठी स्वाक्षरी करीत असल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आला आहे़ याप्रकरणाची प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यंदा दसरा व दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी करण्यात आलेल्या वाहनांचे बुकिंग अगोदरचे दाखविण्यात आले. दिवाळीत लागू झालेल्या सरचार्ज चुकविण्यासाठी आगाऊ बुकिंगचा फंडा वापरात आणला. काही वितरकांनी ‘हॅँडलिंग चार्जेस’च्या नावाखाली ग्राहकांकडून जादा पैसे उकळले. दुचाकी वाहनांसाठी एक हजार व चारकाही वाहनांसाठी पाच हजार रुपये रक्कम वसूल केली जात आहे. हॅँडलिंग चार्जेस दिल्यानंतर पासिंगसाठी ग्राहकांना त्रास दिला जात नाही. सर्वकाही सेटिंग आपोआप होते. मात्र, परिवहन विभागाच्या नियमाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा हा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला. एकाच वेळी अनेक गाड्यांचे पेपर निरीक्षकाकडे सादर करून संबंधित वितरकांकडील कर्मचारी सहजपणे कागदपत्रांवर अधिकाऱ्यांची स्वाक्षरी मिळवतात. ही बाब गंभीर असल्याने अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती मागवली आहे. पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी अजित शिंदे यांनीसुद्धा असा काही प्रकार घडत असेल, तर त्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असे नमूद केले. हॅँडलिंग चार्जेसच्या नावाखाली कोणी वाहनवितरक ग्राहकांकडून पैसे उकळत असेल, कोणाची त्याबद्दल तक्रार असेल, तर नेमकी कारवाई करता येईल. नागरिकांनी स्वत: पुढे येऊन त्याविषयीची तक्रार करावी, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नवीन वाहनांची जुजबी कागदपत्रे पाहूनच पासिंग होत असल्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात येईल. याप्रकरणाची उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.- जितेंद्र पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी