शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

विघातक प्रवृत्तीवर करणार कारवाई- रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 01:07 IST

पुण्यात कोरेगाव भीमा येथे दलित, मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काहींनी केला, असे समाजविघातक कृत्य करणा-यावर कारवाई होईल. 

पिंपरी : पुण्यात कोरेगाव भीमा येथे दलित, मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काहींनी केला, असे समाजविघातक कृत्य करणा-यावर कारवाई होईल. आरपीआय हा केवळ विशिष्ट समाजाचा पक्ष नसून त्यात अन्य समाजघटकांचा समावेश असावा, या भूमिकेतून सामाजिक सलोखा परिषद घेण्यात आली, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.आरपीआय शहर शाखेच्या वतीने पिंपरी येथे गुरुवारी सामाजिक सलोखा परिषद घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते.ते म्हणाले, कोरेगाव भीमा प्रकरणी दोषी असणाºयांवर कारवाई केली जाणार आहे. मराठा समाजाला आर्थिक निकषांच्या आधारे आरक्षण द्यावे, ब्राह्मण, मुस्लिम व अन्य समाजालाही आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. भाजपाबरोबर जाणे उचित ठरेल, असे यापूर्वी ज्यांना वाटायचे, त्यांना आता मी भाजपात असल्याने पोटशूळ उठले आहे. ते टीका करू लागले आहेत. भारिपा बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी यावे, आम्ही ऐक्य करण्यास तयार आहोत. त्यांच्या मागे समाज आहे, आमच्या मागेही समाज आहे. चळवळीत काम करणारे आणखी काही आहेत, त्यांच्याही मागे समाज आहे. वरकरणी ऐक्य नको. आरपीआय हा पक्ष अन्य समाज घटकांचा समावेश केल्याशिवाय वाढू शकणार नाही.या प्रसंगी शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन, प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब भागवत, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, प्रदेश महिला आघाडीच्या सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, रमेश चिमुरकर, तसेच वाहतूक आघाडीचे अजीज शेख, उद्योग आघाडीचे अमित मेश्राम, माजी नागरसेवक लक्ष्मण गायकवाड, पप्पू कागदे, सम्राट जकाते, के़ एम़ बुक्तर आदी उपस्थित होते.राणे यांनी आरपीआयमध्ये यावेमाजी मंत्री नारायण राणे यांना भाजपाकडून काही मिळत नसेल तर त्यांनी आरपीआयमध्ये यावे, अशी आॅफर देत असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री व आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले़ पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, राणे यांना आरपीआयमध्ये आम्ही काही देऊ शकणार नाही, पण त्यांचा मराठा दलित ऐक्यासाठी उपयोग होईल.२०१९ मध्ये भाजपाच्या काही जागा घटतील, पण २५० पेक्षा कमी होणार नाहीत. एनडीए सत्तेत राहील, असे भाकीत त्यांनी केले. शिवसेना भाजपा स्वतंत्र लढल्यास दोघांचेही नुकसान होईल, शिवसेनेचे अधिक नुकसान होईल, उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्यास आपण स्वत: पुढाकार घेणार आहे, तरुणांनी स्वयंरोजगाराकडे वळावे, शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला.या वेळी शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन, पुण्याचे उपमहापौर चंद्रकांत धेंडे, तसेच आरपीआय महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, उद्योग आघाडीचे अमित मेश्राम, बाळासाहेब भागवत आदी उपस्थित होते़

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले