शरद इंगळे , पिंपरीगणेशोत्सवात पीएमपीच्या पिंपरी विभागाच्या विशेष पथकाकडून अवघ्या सात दिवसांत विनातिकीट प्रवास करणाऱ्या सुमारे ५४० प्रवाशांकडून ५४ हजारांची नियमानुसार दंडवसुली करण्यात आली. पिंपरी विभागाने फुकट्या प्रवाशांवर रात्रीच्या कारवाईसाठी १७ सेवकांचे विशेष पथक नेमले होते. त्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावरील मरीआई गेट व ई स्क्वेअर, गणेशखिंड या ठिकाणी पिंपरी विभागाने दोन चेकनाके उभारले होते. गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोईसाठी पीएमपीकडून पहाटे तीनपर्यंत गाड्यांची व्यवस्था केली होती. गणेशोत्सवातील विसर्जनाच्या दिवशी तब्बल १३८ फुकट्या प्रवाशांना दंड करण्यात आला. पुण्यातील गणपती पाहण्यासाठी पिंपरी भागातून अनेक नागरिक समूहाने जात असतात; परंतु गाडीत गर्दी असल्याने प्रवासी गर्दीचा फायदा घेऊन तिकीट काढण्याचे जाणीवपूर्वक टाळतात. काही प्रवासी रात्री तिकीट तपासणारे कोणीही नसेल म्हणून तिकीट काढण्याचे जाणीवपूर्वक टाळतात. गणेशोत्सव काळात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर झालेली दंडात्मक वसुलीची रक्कम ही इतर प्रवासी कारवाईपेक्षा मोठी असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले.
गणेशोत्सवात ५४० फुकट्यांवर कारवाई
By admin | Updated: September 30, 2015 01:10 IST