पुणे : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ५ लाख रुपयांमध्ये घर देण्याच्या योजनेमुळे चांगल्याच अडचणीत सापडलेल्या मेपल गु्रपने आपल्या बाराही प्रकल्पांसाठी नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांची अकृषिक परवानगी व बांधकाम परवानगी घेतली असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.मेपल गु्रपने मोठ्या प्रमाणात जाहिराती देऊन पुण्यातील विविध भागांत ५ लाखांत वन बीएचके घर देण्याच्या जाहीर केले. ५० हजार रुपये बुकिंगची रक्कम भरल्यानंतर १० हजार लोकांना घर देण्यात येईल, असेदेखील जाहिरातीत म्हटले आहे. मेपल गु्रपने केलेल्या जाहिरातीत ‘ही सरकारी योजना असून, पंतप्रधान आवास योजनेतील प्रकल्प असल्याचे’ कंपनीच्या वेबसाईटवर म्हटले आहे. या जाहिरातीवर भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेऊन थेट मुख्यमंत्र्यांकडेच याबाबत तक्रार दाखल केली.(प्रतिनिधी)
‘मेपल’चे बाराही प्रकल्प नियमानुसार : जिल्हाधिकारी
By admin | Updated: April 28, 2016 02:11 IST