शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छतेने अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:36 IST

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : सांगवी येथील ढोरे-पाटील ग्रेड सेपरेटरमधील समस्या

सांगवी : सांगवी फाट्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी व वाहतूक वेगवान होण्यासाठी महापालिकेकडून व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन ढोरे पाटील ग्रेड सेपरेटर व महात्मा ज्योतिबा फुले उड्डाण पुलाची निर्मिती लाखों रुपये खर्चून करण्यात आली. परंतु देखभाल व स्वच्छता न ठेवल्यामुळे येथील परिस्थिती धोकादायक ठरू पहात आहे.

सांगवी फाट्यावरील ग्रेडसेपरेटर मध्ये प्रवेश करतांना उड्डाण पूल ओलांडण्या नंतर रस्त्याच्या कडेला माती व चिखल झाल्याने वेगात येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांचा अपघात व घसरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. येथील रस्त्याच्या कडेला चिखल झाल्याने मोठ्या अपघाताचा धोका आहे. ग्रेडसेपरेटरमध्ये पुरेसा प्रकाश नसून आतील विद्युत दिवे बंद आहेत. तीव्र वळण असल्याने वानधारकांचा गोंधळ होतो. साधारण २५ मीटरनंतर औंध, पुणे जिल्हा रुग्णालयासठी व सांगवीकडे असे दोन मार्ग दिसून येतात. पण ग्रेड सेपरेटरमध्ये पुरेसा प्रकाश व विद्युत दिवे नसल्याने वाहनचालकांना नेमका कोणता मार्ग कुठे जातो हे लक्षात येत नाही. गोंधळून जाऊन वेगात असलेल्या वाहनावर नियंत्रण ठेवणे वाहनचालकांना कठीण जाते. त्यासाठी ग्रेडसेपरेटरमध्ये विद्युत दिवे व दोन रस्ते ज्या ठिकाणी विभागले जातात त्या ठिकाणी सिग्नल अथवा रेडियम रिफ्लेकटर दिशादर्शक लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. येथे दिशादर्शक नसल्याने मोठ्या अपघातास कारण ठरू शकते. याची दखल घेऊन लवकरात लवकर येथे दिशादर्शक बसवण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.उघड्या वीजतारांमुळे धोकासांगवी : नवी सांगवी परिसरातील महापालिका पथदिव्यांच्या खांबांमधील वीजतारा बाहेर आल्या आहेत. त्यामुळे येथे अपघाताचा धोका आहे. सांगवीतील अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा महापालिकेकडून नवीन एलईडी पथदिवे बसवण्यात आले आहेत. त्यासाठी या वीजतारांचा जोड देण्यात आला आहे. मात्र त्या उघड्यावर असल्याने धोका आहे.जुन्या खांबांवर वीज दिव्यांना वरून तारा होत्या. पण नवीन पथदिव्यांना खांबांतून वीजवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. दुरुस्ती करताना या वायरचा जोड उघड्यावर राहिले आहेत. त्यामुळे उघड्या वीज तारा धोकादायक ठरत आहेत. महापालिकेकडून लवकरात लवकर या संदर्भात उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका