शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

खडकी कॅन्टोन्मेंटकडून प्रवेशकर रद्द

By admin | Updated: July 4, 2017 03:37 IST

केंद्र सरकारने देशभर एक जुलैपासून जीएसटी लागू केली आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डनेही ३० जूनच्या मध्यरात्रीपासून सर्वात मोठे

लोकमत न्यूज नेटवर्कखडकी : केंद्र सरकारने देशभर एक जुलैपासून जीएसटी लागू केली आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डनेही ३० जूनच्या मध्यरात्रीपासून सर्वात मोठे उत्पनाचे स्रोत असलेला वाहन प्रवेशकर बंद केला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड काहीसा संभ्रमात आहे. प्रवेश कराला जीएसटी लागू होते का, असा प्रश्न कॅन्टोन्मेंटपुढे असल्याने बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षांनी वरिष्ठांच्या सल्ल्यासाठी प्रवेश कर संकलन नाके तडकाफडकी बंद करण्याचे आदेश देऊन सर्व नाके बंद केले. मात्र बोर्डाकडे उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. खडकी बोर्डाला पूर्वी जकातीच्या माध्यमातून १८ कोटी रुपये महापालिकेकडून मिळत होते. २०१३ साली एलबीटी अस्तित्वात आल्यामुळे खडकी कॅन्टोन्मेंट एलबीटीच्या निकषांमध्ये बसत नसल्याने बोर्डाला १८ कोटींवर हात धुवावे लागले. जकात, एलबीटी बंद झाली. २०१० साली बोर्डाने वाहन प्रवेशकर सुरु केला. सुरुवातीला ३ कोटींच्या निविदेवर बोर्डाने ठेका पद्धतीने प्रवेशकर सुरु केला. २०१० ते २०१७ पर्यंत निरंतर खडकीत प्रवेशकर सुरु होता. तीन कोटींवरून साडेदहा कोटींपर्यंत निविदा काढून ठेकेदारांमार्फत प्रवेशकर संकलन सुरू होते. तत्कालीन सीईओ के. जे. एस. चव्हाण यांनी खडकीतील प्रॉपर्टी टॅक्स दुपटीने वाढवला. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात बोडार्ला ‘अच्छे दिन’ आले होते. मात्र जीएसटी लागू होताच बोर्डाला आता आर्थिक चक्रव्यूहात अडकण्याची भीती जाणवू लागली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठी बोर्डाने याआधी त्यांच्या ठेवीही मोडल्या आहेत. लवकरात लवकर निर्णय घेऊन प्रवेशकर परत सुरू व्हावा, याकरिता बोर्ड पूर्ण काळजी घेत आहे.स्मार्ट कॅन्टोन्मेंट स्वप्नच राहणार का?खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला प्रवेश कराच्या माध्यमातून आठवड्याला साधारण २० लाख रुपये मिळत होते. हे २० लाख रुपये बंद झाल्यामुळे बोर्डाच्या तिजोरीत खडखडाट जाणवू लागला आहे. बोर्डाने आताच कुठे खडकीच्या विकासाची कामे सुरू केली आहे. ही कामे पूर्ण होणार का, कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होईल का, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड खरोखर स्मार्ट होणार का, हॉकीचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या खडकीत ‘अ‍ॅस्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियम’ होईल का, खडकीच्या खेळाडूंना न्याय मिळेल का, असे अनेक प्रश्न सध्या आ वासून उभे आहेत.