शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

अपहरण झालेल्या मुली अद्याप बेपत्ताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 01:19 IST

अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये मात्र दिवसेंदिवस वाढ होत असून, अपहरण झालेल्या अनेक अल्पवयीन मुली अद्यापही बेपत्ताच आहेत.

पिंपरी : अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये मात्र दिवसेंदिवस वाढ होत असून, अपहरण झालेल्या अनेक अल्पवयीन मुली अद्यापही बेपत्ताच आहेत. पळून जाऊन विवाहबद्ध होणाऱ्या मुलींमध्ये अशा अपहरण प्रकरणातील मुलींचे प्रमाण अधिक आहे.शहरातून बेपत्ता होणा-या मुलींमध्ये १५ ते १६ वर्षांच्या मुलींचे प्रमाण अधिक आहे. मुलगी घरातून निघून गेल्यानंतर पालक पोलीस ठाण्यात धाव घेतात. अपहरण झाल्याची फिर्याद दाखल करतात. अनेकदा मुलीचे अपहरण करणा-या संशयित आरोपींविषयी पालक पोलिसांकडे तक्रार करतात. या संशयित आरोपींकडे कसून चौकशी केल्यानंतर मुलगी कोठे पळवून नेली याचा तपास लागू शकतो. मात्र १६ ते १७ वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलीस मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत.दरम्यान, १८ वर्षे पूर्ण होताच, विवाहबद्ध होण्याच्या तयारीने अशा मुलींचे कोणीतरी अपहरण केले असावे, असा अंदाज व्यक्त करून पोलीस या प्रकरणांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अपहरण झालेल्या मुलींचा शोध लागण्याचे प्रमाण नगण्य आहे.>पोलिसांकडे कमी नोंदवयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या तरुणी घरातून बेपत्ता होतात, त्यांच्याबाबत पालक पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल करण्यासही धजावत नाहीत. अशा घटनांची पोलिसांकडे कमी प्रमाणात नोंद होताना दिसून येते. अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. अपहरण होणा-या मुलींमध्ये शाळकरी आणि नुकतेच महाविद्यालयात पदार्पण केलेल्या मुलींचे प्रमाण अधिक आहे.>अपहरणाच्या घटनांत वाढमोशीतून अपहरण करून तरुणीचा जबरदस्तीने मुंबई येथे विवाह लावण्यात आल्याची घटना १३ एप्रिल २०१८ ला घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात चार जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. पिंपरीतील संजय गांधीनगर येथून १६ वर्षीय मुलीचे मागील महिन्यात अज्ञात व्यक्तीने अपहरण केले आहे. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. अशा घटना वारंवार घडू लागल्या आहेत.