शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पाण्याच्या बादलीत पडून चिमुरड्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2023 23:20 IST

मोहम्मद फैजल तारीक खान, असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. 

पिंपरी : घरात खेळत असताना पाण्याच्या बादलीत पडून एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. समतानगर कॉलनी, थेरगाव येथे गुरुवारी (दि. २) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मोहम्मद फैजल तारीक खान, असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. 

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे उत्तर प्रदेशातील तारीक खान (वय २९) आणि जोहरुबी खान (वय २५) हे दाम्पत्य त्यांच्या दोन मुलांसह समतानगर कॉलनी येथे भाडेतत्त्वारील एका खोलीत वास्तव्यास आहेत. तारीक खान हे काचेचे काम करतात. तर त्यांची पत्नी जोहरुबी गृहिणी आहेत. तारीक आणि जोहरुबी हे दोघेही मोहम्मद फैज (वय ३) आणि मोहम्मद फैजल या दोन्ही मुलांसह गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास घरात झोपले होते. 

त्यावेळी एक वर्षांचा फैजल हा झोपेतून उठून रांगत मोरीमध्ये गेला. तेथे प्लास्टिकच्या २० लिटरच्या बादलीमध्ये पाणी होते. खेळत असताना फैजल बादलीत पडला. दुपारी सव्वातीनच्या सुमारास त्याची आई जोहरुबी उठल्या असता फैजल हा बादलीतील पाण्यात पडला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर फैजल याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड