शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

९०४ कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणास दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:46 IST

लोकसभा निवडणूक : कर्मचाऱ्यांना नाही गांभीर्य; वारंवार सूचना देऊनही केले दुर्लक्ष

पिंपरी : लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यात शहरातील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीनही विधानसभा मतदारसंघातून सुमारे ५०४९ कर्मचाºयांसाठी मतदान प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणासाठी तब्बल ९०४ कर्मचारी अनुपस्थित होते.

लोकसभा मावळ मतदारसंघात शहरातील चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा तर शिरूर मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या तीनही मतदारसंघांसाठी मतदान कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाचे विधानसभा मतदारसंघनिहाय आयोजन केले होते. व्हीव्हीपॅट मशिन कशा पद्धतीने कार्य करते, त्यावर मतदारांना दिसणारी पावती, ईव्हीएम यंत्र आणि त्यातील तांत्रिक बाबींची माहिती कर्मचाºयांना देण्यात आली. या यंत्रांची जोडणी, हाताळणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले़ तसेच प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. मतदान सुरळीत पार पडण्यासाठी घ्यावयाची खबरदारी, गोंधळ टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आदींबाबत निवडणूक विभागाच्या अधिकाºयांनी कर्मचाºयांना मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय कार्य आणि कर्तव्य म्हणून निवडणुकीचे कामकाज आणि जबाबदारी पार पाडण्यात येते. त्यामुळे यात कसूर केल्यास कारवाई करण्यात येते. मात्र असे असतानाही काही कर्मचारी प्रशिक्षणास अनुपस्थित राहिले. अशा कर्मचाºयांची विधानसभा मतदारसंघनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यादी पाठविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार नोडल अधिकारी किंवा सक्षम अधिकारी याबाबत कायदेशीर कार्यवाही करतील. गैरहजर कर्मचाºयांवरील कारवाई होऊ शकते.पिंपरीतील ९९ कर्मचाºयांना वगळलेपिंपरी विधानसभा मतदारसंघातील २०७३ कर्मचाºयांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यात १४९२ कर्मचाºयांनी प्रशिक्षण घेतले. ४८२ कर्मचारी अनुपस्थित राहिले. तसेच ९९ कर्मचाºयांना निवडणूक कामाची अन्य जबाबदारी असल्याने प्रशिक्षणास उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांना अनुपस्थित कर्मचाºयांच्या यादीतून वगळले आहे.शिवाजीनगरच्या कर्मचाºयांनाही प्रशिक्षणचिंचवडमधील १३२६ कर्मचाºयांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. यातील १५२ कर्मचारी अनुपस्थित होते. चिंचवड मतदारसंघातील कर्मचाºयांसह शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील कर्मचाºयांनाही प्रशिक्षण देण्यात आले. भोसरीतील १६५० कर्मचाºयांपैकी २७० कर्मचारी अनुपस्थित होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmaval-pcमावळ