शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

तळेगावकरांना ९०० डस्टबिनचे वाटप

By admin | Updated: November 26, 2015 00:45 IST

स्वच्छतेतून समृध्दीच्या वाटेने जाताना कच-याच्या त्रासाने हैराण तळेगावकरांना दिलासा देण्यासाठी नगरपालिकेवर अवलंबून न राहता विरोधी पक्षनेते सुनील शेळके

तळेगाव स्टेशन : स्वच्छतेतून समृध्दीच्या वाटेने जाताना कच-याच्या त्रासाने हैराण तळेगावकरांना दिलासा देण्यासाठी नगरपालिकेवर अवलंबून न राहता विरोधी पक्षनेते सुनील शेळके यांनी स्वत: लाखो रूपये खर्च करुन ९०० डस्टबिनचे मोफत वाटप केले.तळेगाव स्टेशन प्रभाग क्रमांक ३ मधे माजी उपनगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक सुशील सैंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर, नगरसेविका सुजाता खेर, सुरेखा आवारे, शुभांगी शिरसाट, निलिमा दाभाडे, स्टेशन विभाग भाजपा महिला आघाडी अध्यक्षा संगीता शेळके, शोभा भेगडे, रजनी ठाकूर, ठेकेदार राजेंद्र नवले उपस्थित होते. सैंदाणे पुढे म्हणाले की, कच-याच्या गंभीर समस्येबाबत समन्वय नसल्याने सत्ताधारी, पदाधिकारी आणि ठेकेदारांना अपयश आले आहे. त्यामुळे शेळके यांचा हा उपक्रम नागरिकांना दिलासा देणारा आहे. नागरिकांनीही स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याबाबत स्वयंशिस्त पाळली पाहिजे. शेळके म्हणाले, कच-याबाबत नागरिकांत असंतोषाची भावना आहे. घंटागाडी फिरकणार नाही तेंव्हाच या डस्टबिनमधे कचरा टाकावा. स्वच्छतेचे काम काही ठराविक प्रभागातच होत आहे. कच-याबाबत नगरपालिकेतच ताळमेळ नसल्याने वैयक्तिक स्तरावर हा प्रयत्न केला आहे. यापुढे घंटागाडीने डस्टबिनमधील कचरा उचलला नाही तर कार्यकर्ते तो नगरपालिकेत टाकतील. यावेळी जांभूळकर, खेर, नितिन फाकटकर यांची भाषणे झाली. राजू जाधव, सदाशीव धोत्रे, भगवान शिंदे, संकेत गुंजाळ, मंगेश धुळे, मंगल जाधव, शारदा शेटे, रूक्मिणी क्षीरसागर उपस्थित होते. नगरसेवक निलेश लोणकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)