शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारी पार्श्वभूमीचे ८९ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: February 18, 2017 03:26 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रिंगणात एकूण ७७३ उमेदवार असून, त्यांमध्ये विविध राजकीय पक्षांचे ५४२ उमेदवार असून

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रिंगणात एकूण ७७३ उमेदवार असून, त्यांमध्ये विविध राजकीय पक्षांचे ५४२ उमेदवार असून, २३१ अपक्ष उमेदवार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रिंगणात एकूण ७७३ उमेदवार असून, त्यांपैकी ८९ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे २७३ गुन्हे दाखल आहेत. निवडणुकीसाठी एकूण १ हजार ६०८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये महापालिका शाळा व इमारतींचा समावेश असून, १५९ महापालिका शाळा, ३२४ खासगी इमारती, १ शासकीय व २ एमआयडीसी इमारती अशा एकूण ४८६ इमारतींचा समावेश आहे. त्यासाठी प्रशासकीय नियोजन अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.महापालिका निवडणूक २१ फेबु्रुवारीला होत असून, त्यासाठीच्या तयारीबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती देण्यात आली. या वेळी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त यशवंत माने, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, वैशाली जाधव-माने आदी उपस्थित होते. मतमोजणीप्रक्रिया शांततापूर्ण व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी एकूण ८ हजार ९२५ कर्मचारी व १ हजार ७८५ पोलीस कर्मचारी अशा एकूण १० हजार ७१० कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या असून, सर्वांना त्यांच्या कामकाजाबाबत प्रशिक्षणही दिले आहे.(प्रतिनिधी)पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रिंगणात एकूण ७७३ उमेदवार असून, त्यांपैकी ८९ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे २७३ गुन्हे दाखल आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ५७ गुन्हे दाखल करण्यात आले असून ४१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. - दिनेश वाघमारे, आयुक्त, महापालिका१६० उमेदवारांना नोटीस उमेदवार खर्च नियंत्रणासाठी प्राप्तिकर विभागातील पाच निवडणूक निरीक्षकांच्या व विक्रीकर विभागातील पाच सहायक निवडणूक निरीक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ज्या उमेदवार व पक्षांनी मुदतीत निवडणूक खर्च सादर केला नाही अशा १६० उमेदवारांना नोटीस देण्यात आली आहे.८८ मतदान केंद्र संवेदनशील शहरातील ८८ मतदान केंद्रांवरील ३७३ बूथ कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे यांनी दिली. अशा ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. यासह गस्त वाढविण्यात येणार असून, शहरात येणाऱ्या तडीपार गुन्हेगारांचा शोध घेणे यासह ठिकठिकाणी कोम्बिंग आॅपरेशन राबविले जात असल्याचे ते म्हणाले.आचारसंहिता तक्रारींसाठी सुविधाआचारसंहिता भंगाची तक्रार सोप्या पद्धतीने करता यावी व अधिकाऱ्यांना त्याची अंमलबजावणी कमीत कमी वेळेत पूर्तता करता यावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सिटीझन आॅन पोर्टल (सीओपी) हे मोबाइल अ‍ॅप कार्यान्वित केले आहे. व्हॉट्स अ‍ॅप ७४४ ७७५ १३७२ या क्रमांकावर फोटो, व्हिडिओ शूटिंग पाठवून तक्रार करता येऊ शकते. आचारसंहिता भंगाविषयी तक्रार करणाऱ्या नागरिकाचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.