पुणो : दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) 5 सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून 7 देशी बनावटीची पिस्तुले व 17 जिवंत काडतुसे जप्त केली. अटक आरोपींपैकी एकाने 25 दुचाकी वाहनांची चोरी केली असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.
अशपाक शब्बीर मोमीन (वय 32, रा. गंगा व्हिलेज, हडपसर), इम्तियाज रेहमान शेख (वय 33, रा. भवानी पेठ), रवी सदाशिव भांडवलकर (वय 28, रा. गुलटेकडी), विनोद रामदास आरू (वय 4क्, रा. गुलमोहोर, कात्रज) सिराज दौलत खान (वय 35, रा. अहमदनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
एटीएसचे पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे, सहायक निरीक्षक समीर गायकवाड, सुमेध खोपीकर, कर्मचारी सुनील पवार, गणोश गायकवाड, मोहन डोंगरे, शंकर संपत्ते, बारभुजे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट याचा तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)