शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ६ लाखांचा दारूसाठा जप्त

By admin | Updated: February 10, 2017 03:12 IST

उत्पादनशुल्क विभागाने महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईत आचारसंहिता लागू झाल्यापासून सुमारे ५ लाख ९७ हजार ९९२

पिंपरी : उत्पादनशुल्क विभागाने महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईत आचारसंहिता लागू झाल्यापासून सुमारे ५ लाख ९७ हजार ९९२ रुपयांचा दारूसाठा जप्त केला. आतापर्यंत ४८ जणांवर आचारसंहिताभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले. ३५ जणांना अटक करण्यात आली आहे. उत्पादनशुल्क विभागाकडून कारवाईची मोहीम सुरू असून, आचारसंहिता कक्ष अधिक सक्षमतेने कार्यरत झाला आहे. राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या पथकाने विविध ठिकाणचे दारूसाठे जप्त केले. २१ लिटर देशी दारू, ३१ लिटर विदेशी दारू, ४० लिटर ताडी अशा स्वरूपात मद्यसाठा जप्त केला आहे. दारूनिर्मितीसाठी लागणारे १२ हजार १४० लिटर रसायनसुद्धा जप्त करण्यात आले. १३ जानेवारीपासून आचारसंहिता लागू झाली. तेव्हापासून अद्यापपर्यंत विविध पोलीस ठाण्यांत ६९३ गुन्हे दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)पिस्तूल विक्रीस आलेला सांगवीत जेरबंदपिस्तूल विक्रीस आलेल्या एकाला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि १० जिवंत काडतुसे असा ३५ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अनुराग महन्थबहाद्दूर सिंग (वय २२, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अनुराग हा पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकात पिस्तूलविक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती फौजदार विलास पालांडे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले.