शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी

By admin | Updated: May 29, 2017 02:49 IST

उन्हाळी सुटीत अजमेरा कॉलनीत आजीकडे राहण्यास आलेल्या एकवीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : उन्हाळी सुटीत अजमेरा कॉलनीत आजीकडे राहण्यास आलेल्या एकवीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यातील सातही आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली. न्यायालयात त्यांना हजर कले असता त्यांना एक जूनपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ रमेश शेट्टी (२६, सुखवाणी क्लासिक, मोरवाडी), नसीज अहंमद इन्सान अली खान (वय ३१, रा. प्रेमपार्क, अजमेरा कॉलनी), हर्षल देविदास भाटिया (वय २४, मासूळकर कॉलनी), गुरुजितसिंग दस्सार (वय २६, अजमेरा कॉलनी), दानिश मेहबूब चौधरी (वय २३, रा. द्वारकानगरी, कासारवाडी), सिद्धार्थ राजेंद्र झपके (वय १९, वास्तुउद्योग कॉलनी), प्रतीक राजेंद्र परळीकर (वय २७, मोरवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी सहा जण पोलिसांच्या हाती लागले. शनिवारी दुपारी प्रतीक याला पोलिसांनी जेरबंद केले. अजमेरा कॉलनी येथे सुटीसाठी ही तरुणी आजीकडे आली होती. शेजारी राहत असलेल्या सौरभ शेट्टी या तरुणाशी ओळख झाली होती. हा तरुण तिला एक दिवस फिरायला घेऊन गेला. त्या वेळी त्याने तिच्यावर अत्याचार केले. ही गोष्ट त्याने त्याच्या तीन मित्रांनाही सांगितली. त्यानंतर त्या तिघांनीही तिच्यावर अत्याचार केले व तीन मित्रांच्या ओळखीच्या मित्रांनीही पीडितेवर अत्याचार केले होते. याप्रकरणी पीडित तरुणीने आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.