शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पालिका अर्थसंकल्पात पाचशे कोटींची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 02:11 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१८-१९ या वर्षाच्या अर्थसंकल्पाला सर्वसाधारण सभेत मंगळवारी मान्यता देण्यात आली. ग्राह्य ९९५ उपसूचनांपैकी ९८१ स्वीकारल्या असून

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१८-१९ या वर्षाच्या अर्थसंकल्पाला सर्वसाधारण सभेत मंगळवारी मान्यता देण्यात आली. ग्राह्य ९९५ उपसूचनांपैकी ९८१ स्वीकारल्या असून, ५०५ कोटींची वाढ सुचविली असून, त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प ५७६७ कोटींपर्यंत पोहोचला आहे. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेचा मूळ ३५०० कोटी व जेएनएनयूआरएमसह ५२३५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प १५ फेब्रुवारीला स्थायी समितीला सादर केला होता. त्याच दिवशी स्थायी समिती सदस्यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करत त्यामध्ये उपसूचनांद्वारे २७ कोटी रुपयांची वाढ केली. त्यानंतर तीन वेळा सभा तहकूब करून मंगळवारी सुमारे साडेसात तास अर्थसंकल्पावर चर्चा घडवली. चर्चेअंती कोट्यवधी रुपयांच्या हजारहून अधिक उपसूचना जोडल्या. चार मूळ उपसूचनांना १११२ पोट उपसूचना जोडल्या होत्या. त्यानंतर या उपसूचनांचे एकत्रीकरण करून लेखा विभागाकडे छाननी करण्यात आली.या संदर्भातील सर्वसाधारण सभा सुरुवातीला तहकूब करण्यात आली. त्यानंतर नगरसचिव उल्हास जगताप यांनी उपसूचनांचे वाचन केले. ते म्हणाले, ‘‘एकूण उपसूचनांपैकी ९९५ उपसूचना ग्राह्य ठरल्या आहेत. ११७ सूचना अग्राह्य ठरल्या. ९९५ ग्राह्य उपसूचनांपैकी ९८१ उपसूचना स्वीकृत केल्या, तर १४ नाकारल्या आहेत.’’ त्यानंतर स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांनी उपसूचनांसंदर्भात मनोगत व्यक्त केले. स्वीकृत उपसूचनांपैकी ४४४ उपसूचना शून्य तरतुदीच्या आहेत. शहर विकास आराखडा आणि अखर्चित निधीतून ५४५ कोटी रुपयांची तरतूद करावी, असे स्पष्ट केले आहे. त्यापैकी ४५ कोटी १९ लाख रुपयांच्या तरतुदी शहर विकास आराखड्यातून आणि ४९१ कोटी ३१ लाख रुपये रक्कम अखर्चित निधीतून वळविण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात ५०५ कोटींची वाढ झाली आहे. पालिकेचा अर्थसंकल्प ५७६७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यावर महापौर काळजे यांनी, फेरफार, बदलांसह अर्थसंकल्पास मंजुरी दिल्याचे जाहीर केले.