शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मिळकतकरासाठी स्वीकारणार ५००, १००० रुपयांच्या नोटा

By admin | Updated: November 11, 2016 01:45 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेने मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांकडून ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांकडून ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाच्या आदेशानुसार शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत ५०० आणि १००० च्या नोटा स्वीकारल्या जाणार असून शहरातील मिळकतधारकांनी कर भरावा, असे आवाहन महापालिका सहआयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.मंगळवारपासून ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्या आहेत. मात्र, पेट्रोलपंप, गॅस, रुग्णालय, औषधांची दुकाने याठिकाणी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या नगरविकास विभागाने राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिकांना मिळकतकर भरणारया नागरिकांकडून ५०० आणि १००० रुपायांच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी ११ नोव्हेंबर (शुक्रवार) मध्यरात्रीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने मिळकतकरापोटी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ८ नोव्हेंबरपूर्वी महापालिकेने मागणी केलेल्या मिळकतधारकांकडूनच कर भरताना ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. विवादित किंवा प्रतिसाक्षित मिळकतराचा भरणा करून घेतला जाणार नाही. संबंधित मिळकतधारकाला स्वत: किंवा प्राधिकृत केलेली व्यक्ती किंवा ओळखीचा पुरावा सादर करणारया त्रयस्थ व्यक्तीमार्फत महापालिकेकडे मिळकतकर भरता येईल. महापालिकेची सर्व सहा क्षेत्रीय कार्यालये तसेच १६ विभागीय कार्यालयात सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत मिळकतकर भरण्यासाठी येणारया मिळकतधारकांकडून या नोटा स्वीकारल्या जातील, असे गावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)