शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या बाजारात जाणारा ४२० पोती तांदूळ जप्त

By admin | Updated: June 3, 2017 02:10 IST

रेशनिंगचा शासकीय तांदूळ काळ्या बाजारात विकण्यासाठी जाणाऱ्या ट्रकवर तळेगाव पोलीस व मावळ पुरवठा निरीक्षक कार्यालयाकडून

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दाभाडे : रेशनिंगचा शासकीय तांदूळ काळ्या बाजारात विकण्यासाठी जाणाऱ्या ट्रकवर तळेगाव पोलीस व मावळ पुरवठा निरीक्षक कार्यालयाकडून केलेल्या संयुक्त कारवाईत २१ टन वजनाचा ४ लाख २० हजार रुपये किमतीचा ४२० पोती असलेला ट्रक मालासह जप्त करण्यात आला.खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलिसांनी गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा येथे कारवाई केली. या कारवाईमुळे तांदळाचा काळाबाजार करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे़ ट्रकचालक सिराज हबीब सय्यद (वय २६, रा. गुलबर्गा राज्य कर्नाटक) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला वडगाव न्यायालयाने ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, (के ए ३२ बी ६८५०) या क्रमांकाच्या ट्रकमध्ये सोलापूर येथील शासकीय लेबल असलेला ४२० पोती तांदूळ आढळून आला. ताडपत्रीने झाकून चोरटी वाहतूक करण्यात येत होती. खोपोली (रायगड) येथे हा ट्रक जाणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक सुवेज हक व जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार रणजित देसाई, मावळ पुरवठा निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, हवालदार प्रकाश वाघमारे, सुभाष रूपनवर, नितीन साळुंके, जयराज पाटणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. शासकीय लेबल : स्वस्त धान्य दुकानातील मालसोलापूर येथून तूर भरून खोपोली (रायगड) येथे जात असल्याचे ट्रकचालक सय्यद याने सांगितले. उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अधिकाऱ्यांचा संशय बळावला. पाहणी केली असता शासकीय लेबल असलेल्या तांदळाची पोती असल्याचे आढळले. हा तांदूळ स्वस्त धान्य दुकानाचा असल्याचे मावळ पुरवठा कार्यालय सूत्राकडून सांगण्यात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर करत आहे. हा तांदूळ फूड कॉर्पोरेशन इंडिया (पंजाब) राज्याचा असून ट्रकवर संशय येणार नाही, अशी पॅकिंग करण्यात आली होती. अन्न सुरक्षा, अंत्योदय व बीपीएल चा हा तांदूळ असल्याचे मावळ पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.