शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चिंचोलीत २४ तास बत्ती गुल

By admin | Updated: April 29, 2017 04:04 IST

महावितरणकडून चिंचोली परिसरात गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा शुक्रवारी सकाळी दहापर्यंत बंद

देहूरोड : महावितरणकडून चिंचोली परिसरात गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा शुक्रवारी सकाळी दहापर्यंत बंद ठेवण्यात आल्याने चिंचोलीतील पानसरे आळी व भेगडे आळीसह विविध भागांतील नागरिकांना उकाड्याने अक्षरश: हैराण केल्याने गुरुवार-शुक्रवारची रात्र जागून काढण्याची वेळ आली. महावितरणने पूर्वसूचना न देता गुरुवारी दिवसभर व रात्रभर वीज खंडित केल्याने, तसेच तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. चिंचोली परिसरात पूर्वसूचना न देता सकाळी दहापासून वीजपुरवठा खंडित केला होता. गुरुवार असल्याने दुरुस्तीची कामांमुळे वीज बंद ठेवण्यात आली असावी असा अंदाज नागरिकांनी बांधला होता. मात्र, सायंकाळी सातपर्यंत चिंचोलीच्या सर्व भागात वीजपुरवठा खंडित होता. सातच्या सुमारास काही भागातील वीजपुरवठा सुरू झाला. मात्र, चिंचोलीच्या उर्वरित भागातील वीजपुरवठा सुरू न झाल्याने काही नागरिकांनी देहू येथील तक्रार केंद्राच्या भ्रमणध्वनीवर तक्रार केली. संबंधित कर्मचाऱ्याने, देहूगावात काम सुरू असून, त्यानंतर तासाभराने चिंचोलीत येऊन वीजपुरवठा सुरळीत करू अथवा शुक्रवारी सकाळी वीजपुरवठा सुरू करण्यात येईल, असे टाळाटाळ करणारे व बेजबाबदार उत्तर दिले. मात्र गुरुवारी रात्री नऊपर्यंत वाट पाहूनही वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्याने संबंधित अभियंत्यांशी संपर्क साधला असता, चिंचोलीतील दुरुस्तीचे काम शुक्रवारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महावितरणकडे तक्रार आल्यानंतर ४८ तासांत तक्रार निवारण करण्यात येते असे उत्तर दिले. तसेच त्यांच्याकडे देहू आणि तळवडे दोन भाग असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण असल्याने दोन्हींकडे लक्ष देणे शक्य होत नसल्याचे त्यांनी सांगितले. चिंचोली परिसर भोसरी या शहरी विभागात येत असताना पूर्वसूचना न देता २४ तास वीज खंडित ठेवल्याबाबत नागरिक महावितरणच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त करीत आहेत. गुरुवारी सकाळपासून वीजपुरवठा बंद असल्याने गुरुवारी दिवसभर व रात्रभर उकाड्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. अनेकांना रात्र जागून काढावी लागली. अनेकांच्या मोबाइल फोनची बॅटरी उतरल्याने संपर्क साधणे अवघड झाले होते. चिंचोलीत एक फेज जाण्याचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे गावाचा बहुतांश भाग अंधारात राहत असल्याने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)