शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तुटीसाठी २३ कोटींचा प्रस्ताव

By admin | Updated: May 8, 2017 02:44 IST

केंद्र सरकार वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू करण्याची तयारी करीत असून कॅन्टोन्मेन्ट बोर्डाकडून आकारण्यात येणारे जकात, पारगमन

लोकमत न्यूज नेटवर्कदेहूरोड : केंद्र सरकार वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू करण्याची तयारी करीत असून कॅन्टोन्मेन्ट बोर्डाकडून आकारण्यात येणारे जकात, पारगमन शुल्क व वाहन प्रवेशशुल्क बंद होणार असल्याने बोर्डाला होणारी महसुली तूट भरून निघण्यासाठी वार्षिक २३ कोटी रुपये मिळण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याचा निर्णय विशेष बैठकीत घेण्यात आला आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर बोर्डाच्या हद्दीतील सर्व जकात नाके बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एक जुलैपासून केंद्र सरकारकडून जीएसटी लागू करण्याचा निर्णय झाला आहे. विविध पातळ्यांवर विविध निर्णय प्रक्रिया सुरु झाली आहे. त्या अनुषंगाने दक्षिण विभाग प्रधान संचालकांनी याबाबत देहूरोड कॅन्टोन्मेन्टला एप्रिल महिन्यात एक पत्र दिले होते. बोर्ड प्रशासनाला वकील, सनदी लेखापाल, तज्ज्ञांचा सल्ला घेण्याबाबत सुचविले होते. त्यानुसार कॅन्टोन्मेन्ट बोर्ड वस्तू व सेवाकर लागू झाल्यानंतर बोर्डाला मिळणाऱ्या महसुलात किती तूट येईल याबाबत सल्ला घेतला आहे. कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. एस. एन. खुरपे व सनदी लेखापाल चंद्रकांत काळे यांचा सल्ला घेतला आहे. प्रशासनाने मागील तीन वर्षांत वसूल झालेली जकात, पारगमन शुल्क व वाहन प्रवेश शुल्क यांचा आढावा घेतला असून, केंद्राकडून पहिल्या वर्षी २३ कोटी रुपये मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेत ठराव संमत केला. चालू व पुढील आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात याबाबत तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे.जकात कर्मचारी कार्यालयात अन् शिक्षक कोठे? जीएसटी लागू झाल्यानंतर देहूरोड कॅन्टोन्मेन्टच्या हद्दीतील पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील निगडी, शेलारवाडी तसेच शितळानगर (मामुर्डी) तसेच देहूरोड बाजारपेठेतील जकात नाका बंद होणार आहे. या ठिकाणी कार्यरत असणारे कनिष्ठ, वरिष्ठ लेखनिक, शिपाई व शिक्षक अशा ३१ जणांची बदली करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. यातील बोर्ड कर्मचाऱ्यांची कॅन्टोन्मेन्ट कार्यालयात बदली होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शाळांमध्ये विद्यार्थिसंख्या दिवसेंदिवस घटत चालली असताना अतिरिक्त शिक्षक असताना आणखी या ११ शिक्षकांची बदली कोठे करणार, याचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सूत्रांची सांगितले आहे.