शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

बोगस एफडीआर प्रकरणी १८ गुन्हा दाखल होणार; पिंपरी स्थायी समितीचे प्रशासनाला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 11:56 IST

पिंपरी शहरात बोगस एफडीआरचे प्रकरण उघडकीस..

पिंपरी : विविध विकासकामांचे ठेके घेताना एफडीआर आणि बँक गॅरंटी देणे बंधनकारक केले आहे. मात्र, शहरात बोगस एफडीआरचे प्रकरण उघडकीस आले असून  १८ ठेकेदारांना १०७ प्रकरणात बोगस एफडीआर आणि बँक गॅरंटी दिली असल्याचे निष्पन्न झाले आहे. ‘‘ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश स्थायी समितीने प्रशासनास दिले आहेत. त्यानुसार दोन दिवसात कारवाई करणार असल्याचे प्रशासनाने स्थायी समिती सभेत जाहिर केलो आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध विकासकामे केली जातात. स्थापत्य, आरोग्य, उद्यान, वैैद्यकीय, बीआरटी, विविध विकास प्रकल्पांसाठी ठेकेदारांनी निविदेसाठी बँक गॅरंटी आणि एफडीआर देणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार निविदा प्रक्रियेत ही कागदपत्रे महत्वाची असतात.  तसेच कागदपत्रे सत्य असल्याचे हमीपत्रही ठेकेदारांकडून भरून घेतले जाते.

गेल्या तीन वर्षांत अनेक ठेकेदारांनी बोगस एफडीआर सादर केले आहेत. या प्रकरणी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी प्रशासनास पत्र दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते.  आजच्या स्थायी समितीत सत्ताधारी आणि विरोधीपक्षाच्या सदस्यांनी प्रशासनाने कोणती कारवाई केली. याबाबत प्रशासनास प्रश्न विचारला. त्यावर कारवाई अंतिम टप्यात असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.........................एफडीआर हे तीन वर्षातीलपहिल्या टप्यात आढळलेले बोगस एफडीआर तीन वर्षांतील आहेत. त्यात ४३ बोगस बँक गॅरंटी आणि १०७ एफडीआर प्रकरणे आहेत. त्यात २२ कोटींची बँक गॅरंटी आणि दोन कोटींचे एफडीआर आहेत.

..........................अशी आहेत प्रकरणेउद्यान विभाग -८बीआरटी -७अ क्षेत्रीय कार्यालय-४ब   क्षेत्रीय कार्यालय-३क  क्षेत्रीय कार्यालय-१५ड क्षेत्रीय कार्यालय-१०ई क्षेत्रीय कार्यालय-१८फ  क्षेत्रीय कार्यालय-१३ग क्षेत्रीय कार्यालय-२४ह क्षेत्रीय कार्यालय-४

........................स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे म्हणाले, ‘‘विकासकामे करताना एफडीआर देणे गरजेचे असते. याबाबत सभेत प्रशासनास माहिती विचारली. त्यात बोगस एफडीआर प्रकरणी १८ जण दोषी आढळले असून दोन दिवसात त्यांना काळ्या यादीत टाकावे, फौजदारी दाखल करावी, असे निर्देश दिले आहे.’’...........................महापालिकेचे शहर अभियंता राजन पाटील म्हणाले, ‘‘बोगस एफडीआर प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून दोन दिवसात संबंधितांना काळ्या यादीत टाकून गुन्हे दाखल करणार आहे. स्थापत्य, उद्यान, बीआरटी, विद्युत आणि पाणीपुरवठ्यातील ठेकेदारांचा समावेश आहे. दोन दिवसात यावर कायदेशीर कारवाई होणार आहे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकर