शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

स्वतंत्र न्यायालयासाठी स्पाईन रस्त्यावरील १७ एकर जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 02:23 IST

न्यायालयाला स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच वरिष्ठ स्तर दर्जाचे न्यायालय सुरू करावे. त्याचबरोबर कौटुंबिक, औद्योगिक न्यायालये सुरू व्हावीत.

पिंपरी : न्यायालयाला स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच वरिष्ठ स्तर दर्जाचे न्यायालय सुरू करावे. त्याचबरोबर कौटुंबिक, औद्योगिक न्यायालये सुरू व्हावीत. यासाठी पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनच्या पदाधिकारी, सदस्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, शासनाने मोशी स्पाईन रस्ता येथील १७ एकर जागा न्यायालयासाठी मंजूर केली आहे. शासनाकडून निधी उपलब्ध होताच या ठिकाणी न्यायसंकुल उभारणीचे काम सुरू होणार आहे. हे न्यायसंकुल साकारण्यास काही अवधी लागणार असल्याने तात्पुरत्या स्वरूपात नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअमजवळील इमारत भाडेतत्त्वावर घेऊन मोरवाडीतील न्यायसंकुल स्थलांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.प्राधिकरणाच्या इमारतीत न्यायालय सुरू करण्यास जागा द्यावी, अशी मागणी सुरुवातीला वकील संघटनेने केली होती. मात्र त्यावर अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर अजमेरा कॉलनीजवळील महापालिकेची इमारत असा एक पर्यायी जागेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. नागरिकांनी विरोध केल्यामुळे या प्रस्तावावर विचार झाला नाही. त्यानंतर आता नेहरुनगरजवळील इमारतीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने भाडेनिश्चिती करून दिले आहे. पालिकेकडे ही इमारत हस्तांतरित होताच न्यायसंकुल सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २२ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची तीन मजली इमारत आहे. तेथे वाहनतळासाठी मुबलक जागा उपलब्ध आहे.>न्यायसंकुलासाठी वकिलांची स्वतंत्र कमिटीनेहरुनगर येथे तात्पुरत्या स्वरूपात न्यायालय सुरू होईल; मात्र कालांतराने मोशीतील स्वतंत्र जागेत भव्य असे न्यायसंकुल साकारणार आहे. त्यासाठी न्यायसंकुलाचा आराखडाही तयार झाला आहे. अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेश पुणेकर, माजी अध्यक्ष किरण पवार, तसेच सुहास पडवळ, संजय दातीर पाटील, किरण पवार, अतिश लांडगे, योगेश थम्बा, नीलेश घोडेकर, विकास बाबर, कालिदास इंगळे, गणेश शिंदे, गणेश राऊत, देवदास कुदळे, तुकाराम पडवळे, सुभाष तुपे, प्रसन्ना लोखंडे यांची स्वतंत्र कमिटी तयार करण्यात आली आहे. ही कमिटी अन्य आजी-माजी पदाधिकारी, तसेच सदस्यांना विचारात घेऊन न्याय संकुलाच्या उभारणीसाठी जोरदार प्रयत्नशील आहे.>नव्या जागेत स्थलांतराची मागणीपिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात पोहोचली आहे. पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट बार असोसिएशनचे सदस्य संख्या ७५० इतकी आहे. ८ मार्च १९८९ ला मोरवाडी, पिंपरी येथे प्रथमवर्ग दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू झाले. महापालिकेने भाडेतत्त्वावरील इमारतीत ३० वर्षांपासून न्यायालयाचे कामकाज सुरू आहे. ही इमारत जीर्ण झाली आहे, शिवाय जागा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे न्यायसंकुल नव्या इमारतीत स्थलांतरित होणे गरजेचे आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, तसेच कर्णिक आणि पुणे जिल्हा व सत्र न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मोशीतील जागेची पाहणी केली आहे.