वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या ४६५ जागांसाठी १४६४ आणि पोटनिवडणुकीच्या २१ जागांसाठी १० असे १४७४ उमेदवारीअर्ज दाखल झाले आहेत. पोटनिवडणुका होणार असलेल्या १५ पैकी ८ ग्रामपंचायतींत एकही उमेदवारीअर्ज दाखल झाले नाही. मंगळवारी सकाळी ११ला मावळ तहसीलदार महसूल भवन येथे उमेदवारीअर्जांची छाननी होणार असल्याची माहिती तहसीलदार शरद पाटील यांनी दिली. सोमवारी उमेदवारीअर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी झाल्याने शहरात काही काळ वाहतूककोंडी झाली होती. मंगळवारी कोणत्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरणार याकडे लक्ष लागले आहे. उमेदवारीअर्ज विक्री व दाखल करण्यासाठी आलेल्या हजारो नागरिकांची सोमवारी दिवसभर गर्दी होती. ग्रामपंचायतनिहाय जागांची संख्या व दाखल उमेदवारी अर्ज संख्या - डाहुली ७ - २७, कुरवंडे ११- ३५, सोमाटणे १३- ३५, धामणे ९ - ३५, गहुंजे ११ - ३३, सांगवडे ७ - २७, आंबी ११- ३९, उर्से ११- ४७, परंदवडी ९ - २२, दारुंब्रे ९ - २५, कुसगाव खुर्द ७ - २१, चिखलसे ९ - ३४, साई ९ - २४, घोणशेत ९ - २०, कुसगाव बुद्रुक १७ - ६८, खडकाळा १७ - ७५, कशाळ ९ - १९, सिरदे ७ - १७, उकसान ७ - १९, महागाव ९ - ३३, मळवंडी ठुले ७ - १६, तिकोणा ७ - २६, नाणे ९ - २५, अजिवली ७ - १२, कोथुर्णे ७ - २८, करंजगाव ९ - १९, वारू ९ - ४०, आपटी ७ - ८, मोरवे ७ - २४, साते ११- ६१, टाकवे बुद्रुक १३ - ६३, कुसगाव प मा ७ - १८, पाचाणे ९ - १८, कार्ला ९ - ३३, वेहरगाव ९ - ३७ , नवलाख उंब्रे १३ - ४६ , माळेगाव बुद्रुक ९ - १५ , येलघोल ७ - १२ , थुगाव ७ - २५ , येळसे ७ - २० , शिवणे ९ - १३ , शिवली ९ - २२ , आढले खुर्द ९ - १३ , बऊर ९ - २७ , पाटण ९ - २३, मळवली ९ - २७ , वडेश्वर ११ - ४० , खांडशी ७ - २५ , ताजे ९ - ४० , खांड ९ - १७ , आढे ७ -१६. पोटनिवडणूक : सावळा १- १, इंदोरी १ - २ , टाकवे खुर्द १ - १ , नाणोली तर्फे चाकण १ - १, कान्हे १ - २, कुणेनामा १ -१ व औंढे खुर्द १ - २. (वार्ताहर)
४८६ जागांसाठी १४७४ अर्ज
By admin | Updated: July 21, 2015 03:40 IST