शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

सिटी ट्रान्सफॉर्मेशनच्या सल्लागाराला १४ कोटी, पिंपरी-चिंचवड महापालिका : उपसूचनांवर एकमत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 02:44 IST

महापालिका, राज्य व केंद्र सरकारच्या अभियानांतर्गत शहरात ठिकठिकाणी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागार संस्थेची मदत घेणे आवश्यक असते.

पिंपरी : महापालिका, राज्य व केंद्र सरकारच्या अभियानांतर्गत शहरात ठिकठिकाणी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागार संस्थेची मदत घेणे आवश्यक असते. त्यामुळे २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात ‘सिटी ट्रान्फॉर्मेशन’ हे नवीन लेखाशीर्ष निर्माण केले आहे. त्यावर तीन वर्षे कालावधीसाठी १४ कोटी ३१ लाख रुपये खर्च होणार असून, त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात सर्वसाधारण सभेने संमती दिली आहे.महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीमार्फत महापालिका सभेपुढे सादर केला. त्यास सभेने मान्यताही दिली. तथापि, या अर्थसंकल्पात महापालिकेच्या विविध विभागांमार्फत केंद्र व राज्य सरकारच्या अभियानांचाही समावेश आहे. पालिकेमार्फत स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, जलनि:सारण आदी विभागांच्या प्रकल्पांचे कामकाजासाठी सल्लागाराची आवश्यकता आहे.भाडेकरूंच्या आॅनलाइन नोंदीपिंपरी : उद्योगनगरीतील घरमालकांना भाडेकरूंची नोंद आता घरबसल्या करता येणार आहे. महापालिकेने विकसित केलेल्या घरमालक - भाडेकरू ट्रॅकिंग सिस्टीमअंतर्गत ही सुविधा नागरिकांना आॅनलाइन उपलब्ध राहणार आहे. या सेवेमुळे घरमालक आणि भाडेकरू यांची माहिती महापालिकेकडे उपलब्ध राहणार आहे. महापालिकेला उत्पन्न मिळण्याबरोबरच सुरक्षेच्या दृष्टीनेही ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे. या आॅनलाइन सेवेसाठी १० रुपये शुल्क आकारले जाणार असून, त्यांपैकी पाच रुपये सिस्टीम विकसित केलेल्या संस्थेला देण्यात येणार आहेत.घरमालकांना घरबसल्या भाडेकरूची नोंद करणे शक्य व्हावे, याकरिता महापालिकेने घरमालक - भाडेकरू ट्रॅकिंग सिस्टीम विकसित करावी, अशी मागणी तत्कालीन पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी २०१३ मध्ये महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्याची दखल घेऊन ट्रॅकिंग सिस्टीम विकसित केली आहे. त्याबाबतचा डेटा महापालिका सर्व्हरवर ठेवला आहे. या विषयाला महासभेने मान्यता दिली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड