बोल्ड सीन्सचा भडीमार असलेल्या भारतीय वेबसीरीज, घरच्यांसमोर बघाल तर बसाल बोंबलत!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 02:57 PM2021-12-22T14:57:09+5:302021-12-22T15:06:44+5:30

काही वेब सीरिज (Web Series) अशा आहेत ज्यामध्ये बोल्ड सीन (Bold Scenes) असतात. अनेकदा तो सीन फास्ट फॉरवर्ड करायलाही भाग पाडतात.

सध्या वेब सीरिजचा (Web Series) ट्रेंड आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कथा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पण, काही वेब सीरिज अशा आहेत ज्यामध्ये बोल्ड सीन (Bold Scenes)असतात. अनेकदा तो सीन फास्ट फॉरवर्ड करायलाही भाग पाडतात. काही प्रसंग असे येतील की, जे सीन कोणा दुसऱ्यासोबत पाहताना तुम्ही कावरेबावरे व्हाल.

'सेक्रेड गेम्स' (Sacred Games) या वेब सीरिजमध्येही बऱ्याच भागांमध्ये भुवया उंचावणारे बोल्ड, इंटिमेट सीन्स आहेत. त्यामुळे ही सीरिज घरातल्यांसमोर पाहणे कठीण आहे.

अभिनेत्री राजश्री देशपांडे आणि नवाजुद्दीन सिद्दीकीमधील इंटिमेट सीन्स हा त्यापैकीच एक. जो तुम्ही इतर कोणासोबतही पाहू शकणार नाहीत.

'मिर्झापूर' (Mirzapur Web Series)ही अशीच एक वेब सीरिज. जिथं कालीन भैय्या आणि त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणाऱ्या रसिका दुग्गल यांनी असे काही सीन दिले आहेत जे इतरांसोबत पाहणे कठीण आहे.

'गंदी बात' (Gandi Baat) या सीरिजमध्ये नावाप्रमाणेच बरेच बोल्ड सीन्स आहेत. तुम्ही जर ही सीरिज सर्वांसोबत पाहायचा विचार करत असाल तर तो विचार सोडा.

'लस्ट स्टोरीज' (Lust Stories) या सीरिजमधूनही काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यात कियारा आडवाणीच्या बोल्ड सीन्सची चर्चा झाली होती.